---Advertisement---

इंग्लंड संघात अकरा नव्हे, तर दोनच खेळाडू खेळत होते, माजी भारतीय कर्णधाराची यजमानांवर बोचरी टीका

On: मंगळवार, ऑगस्ट 17, 2021 10:09 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाला २७२ धावांची आवश्यकता होती. परंतु, इंग्लिश फलंदाजांना अवघ्या १२० धावा करण्यात यश आले. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपली नावावर केला. हा सामना झाल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटूंनी इंग्लिश खेळाडूंवर बोचरी टीका करत, मोठी भविष्यवाणी केली आहे.

माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी सोनी स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, “इंग्लंडचा संघ २ खेळाडूंचा संघ आहे. या संघात जो रूट आणि जेम्स अँडरसन हे दोनच खेळाडू आहेत. तसेच संघात खेळणारे इतर खेळाडू कसोटी संघातील खेळाडू वाटतच नाही. इंग्लिश फलंदाजांची शैली ही समजण्यापलीकडे आहे. त्यांच्या सलामीवीर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावर येणारा हमिद देखील घाबरून खेळत होता. जो रूट एकटा चांगला खेळला. जॉनी बेअरस्टो कधी खेळतो तर फ्लॉप ठरतो. तसेच बटलर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगला खेळाडू आहे. परंतु, मला नाही वाटत की, तो कसोटी क्रिकेटसाठी फिट आहे.”

जेम्स अँडरसनला सोडून इतर गोलंदाज फेल
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना, इंग्लडचे सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स आणि डोम सिब्ले हे दोघेही भोपळा ही न फोडता माघारी परतले होते. याच खेळपट्टीवर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी नाबाद ८९ धावांची भागीदारी केली होती.

सुनील गावसकरांनी या कामगिरीनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की,”गोलंदाजांमध्ये एकटा जेम्स अँडरसन होता, दुसरा कोणीच नव्हता. नॉटींघममध्ये रॉबिन्सनला ५ गडी बाद करण्यात यश आले होते. परंतु तो पूर्णपणे फिट नाही. यामुळेच मला असे वाटते की, मालिकेतील पुढील ३ सामन्यात भारतीय संघ विजय मिळवेल.”(Sunil Gavaskar prediction for upcoming test matches)

भारतीय संघाने १५१ धावांनी मिळवला विजय 
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलमीवीर फलंदाज लवकर माघारी परलते होते. त्यानंतर कर्णधार रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळ खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही.

अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठ्या मनाचा विराट! विजयाच्या जल्लोषातही दाखवली खिलाडूवृत्ती

टीम इंडियातील ‘त्या’ दोघांना कमी लेखून मोठी चूक केली, जो रूटची कबुली

इंग्लिश माध्यमांमध्ये भारतीय संघाचे गुणगान, तर इंग्लड खेळाडूंवर बोचरी टिका, फोटो तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---