नवी दिल्ली |माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांची जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना होते. ते फलंदाजीच्या उत्कृष्ट शैलीसाठी ओळखले जायचे. मात्र, क्रिकेटचे मैदान गाजवणारे गावसकर समाज सेवेतही मागे नाहीत.
सुनील गावसकर यांची समाजसेवी संस्था ‘द चॅम्प्स फाउंडेशन’ आर्थिक संकटात असलेल्या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना मदत करते. दोन दशकांहून अधिक काळापासून ही संस्था कार्यरत आहे.
आता ही संस्था आजारी असलेले हॉकीपटू मोहिंदर पाल सिंग यांच्या मदतीला धावून आली आहे. 58 वर्षीय मोहिंदर पाल सिंग हे एमपी सिंग म्हणून ओळखले जातात. ते मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असून सध्या डायलिसिसवर आहेत आणि प्रत्यारोपणासाठी किडनी दान करणाऱ्या व्यक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
गावस्कर यांनी पीटीआयला सांगितले की, “ऑलिम्पिकपटू आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते एमपी सिंग यांची प्रकृती खालावल्याची बातमी मी वर्तमानपत्रात वाचली. ही बातमी दिल्याबद्दल मी प्रिंट मीडियाचे आभार मानतो.”
भारतीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून म्हटले की, एमपी सिंग यांना मदत करण्यास भारतीय सरकार समर्थ आहे.”
Govt is committed to look after the welfare of our athletes and former sportspersons. PM Shri @narendramodi Ji has made it clear that the dignity, recognition and well being of our athletes are necessary to make India a powerful sporting nation.
https://t.co/JVcSxXrh1W— Kiren Rijiju (मोदी का परिवार) (@KirenRijiju) November 16, 2020
एमपी सिंग हे 1988 या वर्षी झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघांचे खेळाडू होते. मोहम्मद शाहिद, एमएम सोमय्या, जुड फेलिक्स, पारगत सिंग यासारख्या दिग्गज हॉकीपटूसोबत ते खेळले आहेत.
याआधी भारतात अशी कोणतीही संस्था कार्यरत नव्हती जी देशासाठी योगदान देणाऱ्या खेळाडूंना वाईट काळात मदत करेल. या कारणामुळेच मी ‘द चॅम्प्स फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली, जेणेकरून त्यांना मदत करण्यासाठी मी काहीतरी योगदान देऊ शकलो.”
आतापर्यंत ‘द चॅम्प्स फाउंडेशन’ या संस्थेने 21 माजी खेळाडूंना आर्थिक मदत केली आहे. एवढचं नव्हे, तर त्यांचा वैद्यकीय खर्चही या संस्थेने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळाडू क्रिकेटचे सामने खेळून घालवतात वेळ, भारतीय हॉकीपटूने एसएआयमध्ये राहण्याचा सांगितला अनुभव
कोरोनामुळे घरी न परतण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय हॉकीपटूने हॉस्टेलमध्ये ‘असा’ घालवला वेळ
हॉकी इंडियाने केली मास्टर समितीची स्थापना; सर्व वयोगटातील खेळाडूंना मिळेल संधी