येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गेली २ वर्ष ही स्पर्धा यूएईमध्ये पार पडली. तर यावेळी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व ८ संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने केन विलियम्सन, अब्दुल समद आणि उमरान मालिकला रिटेन केले आहे. तर नुकतीच त्यांनी आगामी आयपीएल स्पर्धेसाठी व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफची घोषणा केली.
केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश करणार आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक,फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Sunrisers Hyderabad)
सनरायझर्स हैदराबाद संघाने मुख्य प्रशिक्षक म्हणून टॉम मुडी (Tom Moody) यांची निवड केली आहे. त्यांनी यापूर्वी देखील सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. हेमांग बदानी (hemang badani) यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सायमन कॅटीच (simon katich) यांची निवड करण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन (dale steyn) सनरायझर्स हैदराबाद संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाचे पद सांभाळणार आहे. तसेच मुथय्या मुरलीधरन (mutthiya Muralidharan) फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची आणि ब्रायन लाराला (brian lara) फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. .(support staff of sunrisers Hyderabad for upcoming ipl season)
यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नरने या संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर एका पाठोपाठ एक सामन्यात पराभव झाल्यामुळे त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच्याऐवजी केन विलियम्सनकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. हा संघ १४ पैकी ११ सामने गमावून गुणातलिकेत सर्वात शेवटी होता. त्यामुळे अनुभवी प्रशिक्षकांची साथ मिळाल्यानंतर येणाऱ्या हंगामात या संघाच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
“त्याच्या पायात स्प्रिंग आहे…”; खुद्द मास्टर-ब्लास्टरने गायले युवा भारतीय गोलंदाजाचे गुणगान
सरावातून वेळ काढत टीम इंडियाची सिनीयर मंडळी पोहोचली सैरसपाट्याला
हे नक्की पाहा :