इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कडक बायो बबल असताना देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडू पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघातील यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा देखील पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अशातच वृद्धिमान साहाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच वृद्धिमान साहाला आइसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. अशातच क्रिकेट चाहत्यांसह त्याचे कुटुंबीय देखील तो लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच त्याच्या मुलीने अन्वी साहाने काढलेलं चित्र त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे.
या चित्रात तिने आपल्या बाबांना सुपरमॅन बनवलं आहे. तसेच तिचा बाबा सुपरमॅन बनून कोरोनाच्या राक्षसाला बुक्की मारताना दिसून येत आहे. तसेच या चित्रावर तिने “लवकर बरे व्हा बाबा” असे लिहिले आहे. या चित्राद्वारे त्याच्या मुलीने बाबांवर असलेले प्रेम व्यक्त केलं आहे.
तसेच हे चित्र वृद्धीमान साहाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केले आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “हे चित्र माझ्यासाठी आता माझे आयुष्य आहे. मियाने मला शुभेच्छा पाठवल्या आहेत. मी तुमचा आणि तुम्ही पाठवलेल्या शुभेच्छांचा आभारी आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.” असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/COf1ZdSllY-/?igshid=1bkfgkh2e59qy
काही दिवसांपूर्वी डेविड वॉर्नरच्या मुलीने काढलेले चित्र देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. त्यामध्ये त्याच्या मुलींनी लवकर घरी येण्याची मागणी केली होती. आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली असली तरी देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंना १५ मेपर्यंत ऑस्ट्रेलियात प्रवेश करता येणार नाहीये. ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकते ‘सरप्राइज एंट्री’, पाहा कोण आहे तो
कोरोना काळात सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून आला सोनू सूद; केली ‘ही’ मोठी मदत






