केवळ 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर आता या खेळाडूचे नशीब बदलले आहे. एका झटक्यात या खेळाडूला आयपीएलमध्ये करोडोंचा फायदा होणार आहे. ज्यात काही दिवसांपूर्वी त्याची किंमत फक्त 20 लाख रुपये होती आता ती 6 कोटी रुपये झाले आहेत. हा खेळाडू सनरायझर्स हैदराबादचा नितीश कुमार रेड्डी आहे. आगामी आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी कोण कायम ठेवणार आहे. या प्रकरणाची जवळपास पुष्टी झाली आहे. आता फक्त मॅनेजमेंटकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पुढील हंगामासाठी सर्व 10 संघांची राखीव यादी 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंतिम केली जाणार आहे. बहुतेक संघांनी ही यादी तयार केल्याचे सांगितले जात आहे. परंतु उर्वरित संघ व्यवस्थापनामध्ये अजूनही भांडणे सुरू आहेत. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादची यादी जवळपास निश्चित झाली आहे. हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि कर्णधार पॅट कमिन्स हे हैदराबादचे पहिले टॉप 3 रिटेन्शन असतील. अशी बातमी आधी आली होती. आता संघ आपल्या 5 खेळाडूंना कायम ठेवणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ट्रॅव्हिस हेड आणि भारताचा नवा आणि उदयोन्मुख खेळाडू नितीश कुमार रेड्डी याचाही नाव जोडला गेला आहे.
एकीकडे ट्रॅव्हिस हेडला 14 कोटी रुपये रिटेनशन म्हणून दिले जात असताना दुसरीकडे नितीश कुमार रेड्डी यांना 6 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. संघाकडे एकच पर्याय राहील. जी टीम लिलावात आरटीएम म्हणून वापरू शकते.
दरम्यान, नितीश कुमारबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या मोसमात त्याला फक्त 20 लाख रुपये मिळत होते. मात्र त्याचे नशीब अचानक बदलले. गेल्या मोसमात त्याने चांगली कामगिरी केली आणि यानंतर त्याला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने भारताकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली. कदाचित त्याचाच परिणाम म्हणजे नितीश कुमार रेड्डीला त्यांच्या संघात 6 कोटींमध्ये कायम केले जाणार आहे.
हेही वाचा-
क्रिकेट विश्वात खळबळ; कर्णधाराच्या घरातून दागिने आणि मौल्यवान पदके चोरीला!
IND vs NZ; रोहित-विराटच्या खराब फाॅर्मबद्दल प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य! म्हणाले…
24 डावानंतर कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज