श्रीलंकन जलदगती गोलंदाज सुरंगा लकमल आपल्या भेदक मारा आणि अचूक टप्प्यासाठी ओळखला जाणार गोलंदाज. लकमलने आत्तापर्यंत आपल्या गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांच्या विकेट काढल्या आहेत. लकमलने आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाज विराट कोहलीला सुद्धा त्रस्त केले होते. पण त्याच्याबद्दल एक गोष्ट अशी आहे जी फारशी कोणाला माहित नाही. ती म्हणजे लकमलच्या पायाला बंदुकीची गोळी लागली होती. हो, हे खरे आहे, ह्या क्रिकेटरला १२ वर्ष पूर्वी आतंकवादी हल्याचा सामना करावा लागला होता.
मार्च २००९, लाहोर हमला
बारा वर्षांपूर्वी ३ मार्च २००९ रोजी पाकिस्तानमध्ये लाहोर स्टेडीअम बाहेर श्रीलंका संघावर आतंकवादी हल्ला झाला होता. ह्या हल्ल्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते, त्यामध्ये लकमल सुद्धा होता. त्यावेळेस त्याचे वय हे केवळ २२ वर्षे इतके होते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले नव्हते. तरीही त्यानी स्वत:चा आत्मविश्वास सोडला नाही. काही महिन्यात तंदुरस्त होऊन मैदानात दाखल झाला. त्याचवर्षी त्यानी भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आपले पदार्पण केले.
विशेष म्हणजे हल्ल्यानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली मात्र, त्याच्या पायातून गोळी काढण्यात आली नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर गोळी काढली असती तर त्याला बरे होण्यास बराच काळ गेला असता आणि कदाचीत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवरही परिणाम होऊ शकला असता. त्याचमुळे तो जेव्हाही एखाद्या मेटल डिटेक्टरमधून जातो, तेव्हा त्या मशीनमधून आवाज येतो.
लकमलची कारकीर्द
लकमलच्या कारकीर्दवर नजर टाकल्यास त्याचे क्रिकेटमधले आकडे हे प्रभावी असे राहिले आहेत. त्यानी आजवर ६६ कसोटी सामने खेळले आहेत आणि ११७ डावात ३६.३१ चा सरासरीने १६७ विकेट्स काढले आहेत. तसेच त्यानी ७ वेळा ४ आणि ४ वेळा ५ विकेट्स काढल्या आहेत.
तसेच त्यानी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८६ सामन्यात ३२.४२ च्या सरासरीने १०९ विकेट्स काढले आहेत. एकदिवसीय सामन्यात ३ वेळा ४ विकेट्स काढले आहेत. लकमलनी टी२० आंतरराष्ट्रीय सामने जास्त खेळले नाहीत. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये फक्त ११ सामने खेळले आहेत. त्यात लकमलनी ४१.२५ चा सरासरीने केवळ ८ विकेट्स काढले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार असताना सर्वोच्च खेळी करणारे ३ फलंदाज
“परदेशी खेळाडूविना आयपीएल स्पर्धा ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारखीच असेल”
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघासाठी आली आनंदाची बातमी, वाचा सविस्तर