आयपीएलच्या धर्तीवर यूपी टी20 लीगचा दुसरा हंगाम सुरू होण्यास काही दिवसच उरले आहेत. लीगच्या पहिल्या हंगामाला क्रिकेटप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेत देशांतर्गत खेळाडूंसोबतच राष्ट्रीय संघातील अनेक नामवंत खेळाडू आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाही (Suresh Raina) या स्पर्धेचा भाग बनला आहे.
सुरेश रैना यूपी टी20 लीगचा ब्रँड ॲम्बेसेडर बनला
खरे तर, यूपी टी20 लीगने सुरेश रैनाला दुसऱ्या हंगामासाठी आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे. पहिल्या हंगामातही त्याने ही भूमिका साकारली आहे. फ्रँचायझीने त्याच्या ॲम्बेसेडर म्हणून नियुक्तीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली आहे.
उल्लेखनीय आहे की, या स्पर्धेचे आयोजन 25 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत केले जाणार असून हे सर्व सामने लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवले जातील. या स्पर्धेत सहा संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार आहे.
View this post on Instagram
लिलावात भुवनेश्वर कुमार ठरला सर्वात महागडा
भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक भुवनेश्वर कुमारही या स्पर्धेत पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवणार आहे. लीगसाठी झालेल्या लिलावात तो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला. लखनऊ फाल्कन्सने उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला 30.25 लाख रुपयांना खरेदी केले. लिलावात त्याची मूळ किंमत 7 लाख रुपये होती.
त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज शिवम मावी हा लिलावात दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला काशी रुद्रने 20.50 लाख रुपयांना विकत घेतले. पीयूष चावलाही 8 वर्षांनंतर यूपी टी20 लीगमध्ये पुनरागमन करत आहे. मात्र, कोणत्याही फ्रेंचायझीला आकर्षित करण्यात तो यशस्वी ठरला नाही. शेवटी त्याला नोएडा किंग्सने 7 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत विकत घेतले. याशिवाय मोहसीन खान, रिंकू सिंग, समीर रिझवी हे स्टार खेळाडूही या लीगचा भाग बनले आहेत. रिंकू सिंग मेरठ मावेरिक्सची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात काशी रुद्रने विजेतेपद पटकावले होते. यावेळी काशी संघ आपले विजेतेपद राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
हेही वाचा –
सुवर्णपदक विजयाच्या आनंदावर विरजण, हेड कोचला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि…
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं