माजी भारतीय क्रिकेटपटू आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना याच्याबाबत मोठी बातमी पुढे येत आहे. रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधूनही निवृत्त (Suresh Raina To Retire From IPL) झाला आहे. याबरोबरच तो उत्तर प्रदेश संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळणार नाही. अर्थात रैना क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला आहे. रैनाने स्वत: उत्तर प्रदेश क्रिकेट संघ आणि बीसीसीआयला याबद्दल माहिती दिली आहे. यानंतर आता तो वेगवेगळ्या परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसू शकतो.
आयपीएलमध्ये राहिला अनसोल्ड
रैनाने 15 ऑगस्ट 2020 ला एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर काही मिनिटातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रैनाच्या भारतीय संघातील पुनरागमनाच्या बातम्या येत असताना अचानक हा निर्णय घेत त्याने सर्वांना चकित केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर रैना आयपीएल 2021 मध्ये खेळला होता. परंतु या हंगामात 12 सामने खेळताना तो फक्त 160 धावा करू शकला होता.
परिणामी आयपीएल 2022 साठी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाने त्याला रिलीज केले. त्यानंतर 2 कोटींच्या मोठ्या किंमतीसह मेगा लिलावात उतरलेल्या रैनाला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
आता घेतला मोठा निर्णय
आता रैनाने आयपीएलला रामराम ठोकत फक्त देश-परदेशातील टी20 लीग खेळण्याचे मन बनवले आहे. एका वृत्तपत्राशी (दैनिक जागरण) बोलताना रैना म्हणाला की, “मला आणखी 2-3 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. उत्तर प्रदेश संघात आता चांगले खेळाडू आहेत आणि ते संघाला योग्यरित्या सांभाळत आहेत. मी यूपीसीएकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. बीसीसीआय सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनाही याबद्दल सूचित केले आहे. आता मी परदेशी लीग खेळण्यासाठी स्वातंत्र्य आहे.”
It has been an absolute honour to represent my country & state UP. I would like to announce my retirement from all formats of Cricket. I would like to thank @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL, @ShuklaRajiv sir & all my fans for their support and unwavering faith in my abilities 🇮🇳
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 6, 2022
या सीरिजमध्ये खेळताना दिसेल रैना
2011 वनडे विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग राहिलेला रैना पुढे म्हणाला की, “मी सर्वप्रथम 10 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळेल. त्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिदा, श्रीलंका आणि युएई लीगनेही माझ्याशी संपर्क साधला आहे. इकडच्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर मी या लीगमध्ये खेळण्याबद्दलची माहिती देईल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Breaking: सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध!
सुपर-4 मध्ये श्रीलंकेशी भिडणार भारत, जाणून घ्या दुबईच्या हवामानाचा अंदाज आणि पिच रिपोर्ट
संघ हरला तरी टीम इंडिया मालामाल! बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर; इतके कोटी पडणार पदरात