आशिया कप 2022 मध्ये हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करून भारतीय संघ सुपर फोरसाठी पात्र ठरला आहे. सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध केवळ 26 चेंडूंत नाबाद 69 धावांची खेळी केली. ज्यात सहा षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. त्याच्या उत्कृष्ट खेळीसह विराट कोहलीनेही 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. भारतीय डावाच्या शेवटी विराट सूर्यकुमारसमोर नतमस्तक झाला होता. मात्र, याच सूर्यकुमारने सहा वर्षांपूर्वी विराटबाबत एक ट्विट केले होते. जे आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सूर्यकुमारच्या व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये त्याने विराट कोहलीला देव म्हटलेले. सूर्यकुमारने 2016 मध्ये एका ट्विटमध्ये लिहिले होते, ‘जेव्हा मोठ्या सामन्यांमध्ये दबाव असतो तेव्हा असे होते. त्यावेळी मी देवाला भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जाताना पाहिले आहे.’
In the big SHOES. Where there is pressure dr is him. I hav seen GOD walking at Number 3 for India to bat @imVkohli pic.twitter.com/zoRfXtillE
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) March 20, 2016
सूर्यकुमार आणि कोहली यांनी तिसऱ्या गड्यासाठी 98 धावांची नाबाद भागीदारी केल्याने भारताने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 192 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. सूर्यकुमारनेही हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीसोबत फलंदाजी करण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सूर्यकुमार म्हणाला, “परिस्थिती अशी होती की, मला वेगानेच धावा बनवायच्या होत्या. कारण सुरुवातीला खेळपट्टी थोडी संथ होती. मी विराटशी बोललो आणि तो मला म्हणाला की, तू तुझा नैसर्गिक खेळ दाखव. माझीही फलंदाजीबद्दलची योजना एकदम स्पष्ट होती. विराटसोबत फलंदाजी करायला खरोखरच खूप मजा आली.”
सूर्यकुमार यादव याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतासाठी 30 पेक्षा कमी टी20 सामने खेळताना पाच सामनावीर पुरस्कार मिळवणारा सूर्यकुमार पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराट-सूर्यापेक्षा बाबर चांगला…’ म्हणणाऱ्या पत्रकाराला टीम इंडियाच्या चाहत्यांनी केले ट्रोल
टीम इंडियाची खिलाडूवृत्ती! हॉंगकॉंगच्या संघाला केले ड्रेसिंग रूममध्ये आमंत्रित; पाहा खास छायाचित्रे
केएल राहुलला अजून संधी दिल्याच पाहिजे! भारताच्या माजी कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया