टीम इंडियाने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर, रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला टी20 आंतरराष्ट्रीय संघासाठी भारतीय संघाचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले. तेव्हापासून भारतीय संघ टी20 मालिका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. पण सूर्यकुमारच्या खराब फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. अश्या परिस्थितीत त्याच्यावर अधिक प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याची फलंदाजी टी20 क्रिकेटमध्ये हिट होती.2022 ते 2023 दरम्यान, त्याने 47 च्या प्रभावी सरासरीने आणि 173.80 च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने 1897 धावा केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील 73% धावा आहेत. पण कर्णधार झाल्यानंतर त्याचा फॉर्म घसरला आहे. आतापर्यंत त्याने 23 च्या सरासरीने आणि 165.46 च्या स्ट्राईक रेटने फक्त 230 धावा केल्या आहेत.
कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने फक्त दोनदा 50 धावांचा टप्पा ओलांडून मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले आहे. एकदा त्याने श्रीलंकेविरुद्ध 223 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा केल्या होत्या. दुसऱ्यांदा, त्याने बांग्लादेशविरुद्ध 214 च्या स्ट्राईक रेटने 75 धावा केल्या. याशिवाय, त्याला 30 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव
सामने – 18
जिंकले – 14
हरले – 03
अर्निणीत – 1
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेतील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्याच टी20 मध्ये भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्स आणि 43 चेंडू राखून सहज विजय मिळवला. पहिल्या डावात खेळताना इंग्लंडने सर्व गडी गमावत 20 षटकात 133 धावा केल्या. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हा सामना 12.5 षटकात खिश्यात टाकला. ज्यात डावखुरा अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना नाचवलं, त्याने 34 चेंडूत 79 धावांची तुफानी खेळी खेळली. ज्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
हेही वाचा-
IND VS ENG; अभिषेकची तुफानी तर चक्रवर्तीची शानदार कामगिरी, टीम इंडियाने बनवला खास विक्रम
अभिषेक शर्मानं इतिहास रचला, 18 वर्ष जुना ‘गुरु’ युवराज सिंगचाच महान रेकाॅर्ड मोडला
IND vs ENG; अभिषेक शर्माचे तुफानी अर्धशतक! भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा