इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाला अवघ्या काही दिवसांचा वेळ बाकी आहे. प्रत्येक संघ आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी तयारी करत आहे. प्रत्येकी पाच-पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ देखील आगामी हंगामासाठी सराव करत आहेत. पण सूर्यकुमार यादव आगामी हंगामात खेळणार की नाही, यावर अद्याप कुठलीच ठोस माहीत मिळाली नाहीये. अशातच मंगळवारी (19 मार्च) सूर्यकुमारने इंस्टाग्राम स्टोरीमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) हंगामात मुंबई इंडिन्स (Mumbai Indian) संघ हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वात खेळणार आहे. मुंबईला यावर्षी सहावी आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याची जबाबदारी हार्दिकच्या खांद्यावर आहे. पण संघातील खेळाडूंच्या दुखापतींमुळे कर्णधाराची चिंता देखील दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यावर्षी आयपीएल हंगाम गाजवणार, असे चाहत्यांना वाटत होते. मागच्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार दुखापतग्रस्त आहे. पण त्याच्या फिटनेसविषयी अद्याप कुठलीच माहिती बीसीसीआय किंवा मुंबई इंडियन्सकडून मिळाली नाहीये. अशातच त्याने मंगळवारी (19 मार्च) हर्टब्रेकची इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यामुळे सर्वचजण विचारात पडले आहेत. या स्टोरीमुळे सूर्यकुमार आगामी आयपीएल हंगामात खेळणार नाही, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत.
Suryakumar Yadav’s Instagram story. pic.twitter.com/2M7ZGBhTDN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 19, 2024
दरम्यान, आयपीएल 2022 हंगामाची सुरुवात शुक्रवारी (22 मार्च) होणार आहे. पहिल्या दिवशी ओपनिंग सेरेमनी पार पडल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामना आयोजित केला गेला आहे. मुंबई इंडियन्सला आपला पहिला सामना रविवारी (24 मार्च) रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात मुंबईला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकवून देणारा रोहित शर्मा हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. तर दुसरीकडे मागच्या दोन हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात खेळणारा गुजरात संघ शुबमन गिल याच्या मार्गदर्शनात खेळायला सुरुवात करेल.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी सूर्यकुमार यादव बाबत मोठी बातमी, जाणून व्हाल थक्क
स्वतः अश्विनला नाही मिळालं सीएसकेच्या मॅचचं तिकिट! फिरकीपटूने सोशल मीडियावर व्यक्त केली खंत