भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी२० सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ८ बाद १८५ धावा बनवल्या. केवळ दुसरा सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने आक्रमक अर्धशतक झळकावत कारकीर्दीची दमदार सुरुवात केली. त्याने पहिल्याच चेंडूवर असा काही कारनामा केला, ज्यामुळे सर्वजण अवाक् झाले.
सूर्यकुमारचा पदार्पणात करिष्मा
देशांतर्गत क्रिकेट व आयपीएल गाजवल्याने, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सूर्यकुमार यादवने भारतासाठी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून पदार्पण केले होते. मात्र, त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तिसऱ्या सामन्यात त्याला बाकावर बसावे लागले होते.
त्यामुळे, सूर्यकुमारने खर्या अर्थाने आज आपले फलंदाजी पदार्पण केले. सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्या चेंडूला सामोरे जात फाईन लेगच्या दिशेने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकला.
https://twitter.com/Yadavpraveen23/status/1372582808854487044
लो मैं आ गया #SuryakumarYadav @surya_14kumar #Sixers pic.twitter.com/85gtvGLU8L
— Sky (@sky001984) March 18, 2021
सूर्यकुमारने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावामध्ये अत्यंत आक्रमक फलंदाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने अवघ्या ३१ चेंडूमध्ये ६ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने ५७ धावा ठोकल्या. अखेर १४ व्या षटकात तो पंचांच्या एका वादग्रस्त निर्णयाचा शिकार बनला.
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1372546831259901956
भारताची आव्हानात्मक धावसंख्या
काहीश्या खराब सुरुवातीनंतर भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या ५७, श्रेयस अय्यरच्या ३७ व रिषभ पंतच्या ३० धावांच्या जोरावर भारतीय संघाने ८ बाद १८५ धावा उभारल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन बळी मिळविले.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: आऊट की नॉटआऊट? सुर्यकुमार, सुंदरची विकेट ठरली वादग्रस्त, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
भारतात रोहितच ‘सिक्सर किंग’! पहिल्या चेंडू षटकार मारत ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
हिटमॅनचा विक्रम! १२ धावांवर बाद होऊनही रोहितने टी२० क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ मोठा टप्पा