दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिमय, दुबई येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा अंतिम सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईनेही दमदार फलंदाजी केली. दरम्यान मुंबईचा शिलेदार सूर्यकुमार यादव धाव घेण्याच्या गोंधळात आपली विकेट गमावून बसला.
झाले असे की, दिल्लीच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाच षटकांच्या आतच मुंबईला पहिला झटका बसला. मुंबईचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकला मार्कस स्टॉयनिसने रिभष पंतच्या हातून झेलबाद केले. पुढे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव चांगली भागिदारी करत संघाचा डाव पुढे नेत होते.
अशात डावातील ११वे षटक टाकण्यासाठी दिल्लीचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन आला. त्याच्या षटकातील पहिल्या चार चेंडूंवर रोहित आणि सूर्यकुमार एकही चौकार किंवा षटकार लगावू शकले नाहीत. शेवटी रोहितने पाचव्या चेंडूवर एक साधारण शॉट मारला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. परंतु, नॉन स्ट्राईकर बाजूला असलेला सूर्यकुमार त्याला धाव घेऊ नको म्हणून सांगत होता. तरीही रोहित पळाला आणि धाव घेण्याच्या भाबड्या गोंधळात प्रविण दुबे आणि रिषभ पंतच्या हातून सूर्यकुमार धावबाद झाला.
अशाप्रकारे केवळ २० चेंडूत १ चौकार आणि १ षटकार लगावत १९ धावांवर सूर्यकुमार पव्हेलियनला परतला. तरीही पुढे इशान किशनने संघाचा डाव पुढे नेत संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
शानदार ‘हिटमॅन’! दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत रोहितचे तडाखेबंद अर्धशतक; अनोख्या विक्रमाला गवसणी
रोहित…रोहित…मुंबई…मुंबई…फायनलमध्ये रोहितचा मुंबईकडून ‘हिट’ विक्रम
एकच नंबर ! आयपीएलमध्ये धोनी, रोहित, जडेजासह या खेळाडूंनी केले भन्नाट रकॉर्ड
ट्रेंडिंग लेख-
वादविवाद ! IPL २०२० : ‘या’ ५ घटनांमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम कोणीच विसरू शकत नाही
आयपीएलचा दादा संघ !! आयपीएलचे शानदार विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबईचा आजपर्यंतचा प्रवास
मैत्री असावी तर अशी! खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवलेले ४ अविस्मरणीय क्षण