भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (१८ फेब्रुवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर तिसरा टी२० सामना पार पडला. भारतीय संघाने १७ धावांनी हा सामना जिंकला आहे. यासह यजमानांनी ३-० अशा फरकाने ३ सामन्यांची टी२० मालिका आपल्या नावे केली. यापूर्वी वनडे मालिकेतही भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३-० ने क्लिन स्वीप केले होते. या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणारा भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव सामनावीर ठरला. आपल्या आक्रमक खेळी दरम्यान सूर्यकुमारने काही आक्रमक फटके. त्यामध्ये त्याने मारलेला एक षटकार प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
सूर्यकुमारची तुफानी खेळी
सूर्यकुमार यादव या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. संघ संकटात असताना पुन्हा त्याने जबाबदारीने खेळ केला. संथ सुरुवात केल्यानंतर त्याने वेस्ट इंडिजच्या सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्याने भारतीय डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी ३१ चेंडूवर एक चौकार व तब्बल सात षटकारांची आतिषबाजी करत ६५ धावा चोपल्या. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील चौथे अर्धशतक ठरले. अखेरच्या पाच षटकामध्ये त्याने त्याने व्यंकटेश अय्यरसह ८६ धावा कुटल्या.
https://twitter.com/theCricketHolic/status/1495408864396988418?t=O1zBN37POzWF1fXERLYLkA&s=19
ड्रेक्सला ठोकला अप्रतिम षटकार
आपल्या वादळी खेळीदरम्यान सूर्यकुमार याने ७ गगनचुंबी षटकार ठोकले. त्यापैकी डॉमिनिक ड्रेक्स याला मारलेला षटकार लाजवाब असा होता. भारतीय डावातील सोळावे षटक टाकण्याची जबाबदारी कायरन पोलार्ड याने ड्रेक्सला दिली. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सूर्यकुमार याने गुडघा टेकून चेंडू लेग साईडच्या दिशेने फ्लिक केला. त्याने लगावलेला हा फटका षटकार ठरला. चाहत्यांसाठी हा डोळ्यांचे पारणे फेडणारा षटकार होता. समालोचकांनी हा दिवसातील सर्वात्तम फटका असल्याचे देखील म्हटले.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर होण्यास का होतोय विलंब? कारण आले पुढे (mahasports.in)