आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे. त्यापूर्वी प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी एक मोठी भविष्यवाणी केली. आकाश चोप्रा यांच्या मते, सूर्यकुमार यादव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही, कारण तो एकदिवसीय संघात फिट बसत नाही.
भारतीय संघानं सूर्यकुमार यादवला नुकताच टी20 कर्णधार म्हणून नियुक्त केलं. त्यानं कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्याला मागे टाकलं. मात्र सूर्याला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, सूर्यकुमार यादव टी20 टीमच्या सेटअपचा हिस्सा असेल.
आकाश चोप्रा यांनी आपल्या युट्यूब चॅनवलर सांगितलं, “सूर्यकुमार यादव 2023 विश्वचषक फायनलमध्ये पोहचलेल्या भारतीय संघाचा भाग होता. तसेच ते 2024 टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा देखील सदस्य होता. त्यानं फायनलमध्ये डेव्हिड मिलरचा उत्कृष्ट झेल घेतला होता. मात्र आता सूर्या भारताच्या वनडे टीमचा भाग नाही. तो अत्यंत खास खेळाडू आहे, मात्र तो आता केवळ टी20 संघात खेळताना दिसेल. जर चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे आणि संघात त्याच्या नावाची चर्चा होत नाही, याचा अर्थ सूर्यकुमार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही.”
आकाश चोप्रा यांनी सांगितलं की, शुमबन गिलचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणं पक्क आहे. चोप्रा म्हणाले, “गिल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळेल. आगरकर यांनी सांगितलं की, गिल तिनही फॉरमॅटचा खेळाडू आहे. गौतम गंभीरचं पणं म्हणणं आहे की, जर भारताला तिनही फॉरमॅट खेळणारा खेळाडू मिळाला, तर काही वाईट नाही. गिलनं संघाचं नेतृत्व देखील केलं आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात त्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.”
शुबमन गिलनं झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेचा 4-1 असा पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेचे 3 खेळाडू, जे टी20 मालिकेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतात
आयपीएलसह भारतासाठी सर्वाधिक टी20 विकेट; तरीही वर्ल्डकपमध्ये…! वाढदिवशी जाणून घ्या फिरकीपटूची आकडेवारी
ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं पदक खेळाडू दातांनी का चावतात? हा नियम आहे की परंपरा? जाणून घ्या