मुंबई । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात हरियाणाच्या संदिप्ती राव हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबच एकेरी गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत मुलांच्या गटात उदयवीर सिंग व धृव तंग्री यांनी, तर मुलींच्या गटात संदिप्ती राव व वंशीका चौधरी यांनी विजेतेपद संपादन केले.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत हरियाणाच्या तिस-या मानांकीत सुशांत दबसने गुजरातच्या सोळाव्या मानांकीत मोहीत बोंद्रेचा 6-2, 7-5 असा तर हरियाणाच्या चौथ्या मानांकीत दिवेश गहलोतने आसामच्या दुस-या मानांकीत उदित गोगोईचा 3-6, 6-0, 7-6(5) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात हरियाणाच्या तेराव्या मानांकीत संदिप्ती रावने तमिळनाडूच्या विपाशा मेहेराचा 7-6(3), 7-6(5) असा संघर्षपुर्ण लढतीत तर महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकीत सुदिप्ता सेंथिली कुमारने महाराष्ट्राच्या दुस-या मानांकीत प्रेरणा विचारेचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात आसामच्या उदयवीर सिंगने पश्चिम बंगालच्या धृव तंग्रीच्या साथीत हरियाणाच्या सुशांत दबस व दिवेश गहलोत या जोडीचा 6-3, 3-6, 10-8असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मुलींच्या गटात हरियाणाच्या संदिप्ती राव व उत्तरप्रदेशच्या वंशीका चौधरी यांनी महाराष्ट्राच्या रिचा चौघुले व प्रेरणा विचारे यांचा 6-3, 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट : उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुले:
सुशांत दबस(3)(हरियाणा) वि.वि मोहीत बोंद्रे(16) (गुजरात)6-2, 7-5
दिवेश गहलोत(4)(हरियाणा) वि.वि उदित गोगोई (2) (आसाम) 3-6, 6-0, 7-6(5)
मुली-
संदिप्ती राव(13) (हरियाणा)वि.वि विपाशा मेहेरा(तमिळनाडू)7-6(3), 7-6(5)
सुदिप्ता सेंथिली कुमार (14)(महाराष्ट्र) वि.वि प्रेरणा विचारे(2)(महाराष्ट्र)6-0, 6-2
दुहेरी गट-मुले- अंतिम फेरी
उदयवीर सिंग(आसाम)/धृव तंग्री(पश्चिम बंगाल) वि.वि. सुशांत दबस(हरियाणा)/दिवेश गहलोत (हरियाणा)6-3, 3-6, 10-8;
मुली- संदिप्ती राव(हरियाणा)/वंशीका चौधरी(उत्तर प्रदेश) वि.वि.रिचा चौघुले(महाराष्ट्र)/प्रेरणा विचारे(महाराष्ट्र) 6-3, 6-3.