महिला बिग बॅश लीगमधील अंतिम सामना शनिवारी (२८ नोव्हेंबर) सिडनी येथे महिला मेलबर्न स्टार्स विरुद्ध महिला सिडनी थंडर्स संघात झाला. या सामन्यात सिडनी संघाने ७ विकेट्सने सामना जिंकला. यासोबतच त्यांनी महिला बीबीएलच्या सहाव्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. या विजयात सिडनी संघाच्या गोलंदाजी विभागाने मोलाची कामगिरी केली.
या सामन्यात नाणेफेक जिंकत मेलबर्न संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत केवळ ८६ धावाच केल्या. हे आव्हान पार करताना सिडनी संघाने अफलातून कामगिरी केली. त्यांनी अवघ्या १३.४ षटकात ३ विकेट्स गमावत ८७ धावा केल्या.
सिडनी संघाकडून फलंदाजी करताना हिदर नाईटने सर्वाधिक धावांची खेळी केली. तिने १९ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २६ धावा केल्या. तिच्यासोबतच रचेल ट्रेनमन नाबाद (२३) आणि कर्णधार रॅचेल हेनसने नाबाद (२१) धावा केल्या. इतर फलंदाजांना २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
💥 Sydney Thunder are the #WBBL06 champions 💥
A brilliant bowling performance helped Thunder restrict Melbourne Stars to 86/9, before their batters chased it down in just 13.4 overs with seven wickets in hand 👏
What a way to win the final 💪 pic.twitter.com/pK1hy2PIo3
— ICC (@ICC) November 28, 2020
मेलबर्न संघाकडून गोलंदाजी करताना कॅथरीन ब्रंट, अलाना किंग आणि टेस फ्लिंटॉफ यांनी प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्सकडून कॅथरीन ब्रंटने सर्वाधिक धावा केल्या. तिने २७ चेंडूत नाबाद २२ धावा केल्या. सोबतच ऍनाबेल सदरलँडने २० धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांना २० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.
यावेळी सिडनी संघाकडून गोलंदाजी करताना शबनीम इस्माईल आणि सॅमी-जो जॉनसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सोबतच समंथा बेट्स, हॅना डार्लिंगटोन, लॉरेन स्मिथ आणि हिदर नाईटने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाविरुद्ध स्टिव्ह स्मिथच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंदच भल्याभल्यांना ठरला वरचढ
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
“मनीष पांडे दुर्दैवी”, हार्दिकला संघात स्थान दिल्याबद्दल माजी दिग्गजाचे रोखठोक मत
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके