सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या ग्रुप क मधील दिल्ली विरुद्ध मणिपूर यांच्यात झालेल्या सामन्यात असे काही घडले जे टी20 क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही घडले नव्हते. दिल्लीच्या नावावर पूर्णपणे वेगळा विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे. टी20 सामन्यात दिल्लीकडून 11 पैकी 11 खेळाडूंनी गोलंदाजी केली. आयुष बदोनी संघाचा कर्णधार असून यष्टिरक्षकही आहे. या सामन्यात त्याने गोलंदाजीतही हात आजमावला. 11 खेळाडूंपैकी कोणीही चार षटकांचा कोटा पूर्ण केलेला नाही. हर्ष त्यागी, दिग्वेश राठी आणि मयंक रावत यांनी प्रत्येकी तीन षटके टाकली. तर आयुष सिंग, अखिल चौधरी आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी दोन षटके टाकली. तर आर्यन राणा, हिम्मत सिंग, प्रियांश आर्य, यश धुल आणि अनुज रावत यांनी प्रत्येकी एक ओव्हर टाकली.
मणिपूरने 20 षटकांत आठ गडी बाद 120 धावा केल्या. मणिपूरने 41 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. यानंतर कर्णधार रेक्स राजकुमार आणि यष्टिरक्षक अहमद शाह यांनी मिळून मणिपूरसाठी निर्णायक धावा जोडल्या. मणिपूरसाठी अहमद शाहने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर उलेनीने आघाडीच्या फळीत 19 धावा केल्या.
All of the 11 bowled for Delhi in SMAT. 🤯 pic.twitter.com/NyLZMGhcrp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 29, 2024
मणिपूरसाठी खालच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये धावा केल्या नसत्या तर संघाची धावसंख्या 100 धावाही झाली नसती. टी-20 क्रिकेटमध्ये यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. जेव्हा एका संघातील 11 पैकी 11 खेळाडूंनी गोलंदाजी केली असेल आणि आता हा विश्वविक्रम दिल्लीच्या नावावर नोंदवला गेला आहे. या सामन्यात मणिपूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क गटात दिल्ली सध्या तिन्ही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
हेही वाचा-
NZ vs ENG: अद्भुत, अविश्वसनीय..! ग्लेन फिलिप्सनं पकडला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO
चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार? पाहा राजीव शुक्ला यांचे टीम इंडियाबाबत मोठे अपडेट
IND VS AUS; ‘दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार’, सुनील गावस्करांचा दावा