सय्यद मुश्ताक अली २०२१-२२ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने गुरुवारी (१८ नोव्हेंबर) दिल्ली मध्ये पार पडणार आहेत. या ४ सामन्यांमध्ये ८८ क्रिकेटपटू दिल्लीच्या मैदानावर खेळताना दिसून येणार आहेत. दिवाळी झाल्यानंतर दिल्लीच्या हवा प्रदूषणात खूप वाढ झाली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना जीव धोक्यात टाकून इथे खेळावे लागणार आहे.
विषारी हवा असूनही, पालम येथील अरुण जेटली स्टेडियम आणि एअर फोर्स ग्राउंडवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी२० स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरी कोणतीही अडचणीशिवाय पार पडली. उपांत्यपूर्व फेरीतील सामने देखील दिल्लीत होणार आहे, प्रत्येक ठिकाणी दोन सामने आयोजित केले जातील, एक सामना सकाळी असणार आहे, तर दुसरा सामान दुपारी असणार आहे.
विदर्भ आणि राजस्थानमध्ये रंगणार सामना
राजस्थान आणि विदर्भ या दोन्ही संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत पाहायला मिळणार आहे. विदर्भ संघातील सलामीवीर अथर्व तायडे आणि कर्णधार अक्षय वाडकर संघासाठी चांगल्या धावा करत आहेत आणि दोघेही वेगवान गोलंदाज तनवीर-उल-हक आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई यांचा समावेश असलेल्या राजस्थानच्या आक्रमणाविरुद्ध धावा करण्याचा विचार करतील.
तसेच मध्यक्रमात शुबमन दुबे आणि जितेश शर्मा हे मोलाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात. राजस्थान संघाकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा दीपक हुड्डाकडून असणार आहे. त्याने बडोदा संघ सोडून राजस्थान संघात प्रवेश केला आहे.
आणखी एक सामना तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. विजय शंकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या तामिळनाडू संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील केरळ संघाविरुद्ध संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. मात्र, भारत अ संघात निवड झालेल्या अपराजित या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.
याबरोबरच गुजरात आणि हैदराबाद संघ आमने-सामने येणार आहे. पालम येथील एअरफोर्स ग्राउंडवर राजस्थान विरुद्ध विदर्भ सामना सकाळी ८:३० वाजता सुरू होईल. तर दुसरा सामना गुजरात आणि हैदराबाद यांच्यात दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. पहिला सामना तमिळनाडू विरुद्ध केरळ यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर, तर दुसरा सामना बंगाल आणि कर्नाटक यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्याच षटकात फलंदाजाला गोल्डन डकवर बाद करायचंय? मग भुवी आहे ना!
बोल्टचे आभार मानत सूर्यकुमारने पत्नीला दिली वाढदिवशी खास भेट
लयीत परतला भुवनेश्वर कुमार! वेगवान चेंडूवर उडवला न्यूझीलंडच्या सलामीवीराचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ