भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी (2 नोव्हेंबर) रोमांचक लढत पाहायला मिळाली. भारताने या सामन्यात पाच धावांच्या अंतराने जिंकला. पावसाने सामन्यात बाधा आणल्यानंतर पंचांनी डकवर्थ लुईस नियमाचा वापर केल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले. पंचांचा हा निर्णय अनेक बांगलादेशी चाहत्यांसाठी निराशाजनक ठरल्याचे दिसले. तसेच विराट कोहली याच्यावरही बांगलादेशचे चाहते नाराज दिसले. विराटने फलंंदाजी करताना पंचांकडे नो बॉलसाठी मागणी केली होती, जी पंचानी मान्य देखील केली. भारताचा माजी दिग्गज गौतम गंभीर यानेही विराटच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
गौतम गंभीर (Gautam Gambhir) क्रिकेटविश्वात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच व्यक्त होत असतो. त्याने यापूर्वी अनेकदा भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला धारेवर धरले आहे. विराटने केलेल्या चुका गंभीरने उघडपणे बोलून दाखवल्या आहेत. अशात त्याने विराटची अजून एक चूक बोलून दाखवली, जी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना केली. विराटने या सामन्यातील 16 व्या षटकात ही चूक केली. त्याने या षटकात पंचांकडे नो बॉलसाठी मागणी केली आणि पंचानी ती मागणी मान्य देखील केली.
पंचानी हा नो बॉल दिसला असला, तरी गंभीरला वाटते की, फलंदाजाने अशा प्रकारे पंचांकडे मागणी करणे योग्य नाही. या षटकात बांगलादेशचा हसन महमूद गोलंदाजी करत होता. विराटने या चेंडूवर एक धान देखील घेतली. विराटने या सामन्यात एकूण 44 चेंडू खेळले आणि 64 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. विराटने मैदानात केलेल्या या प्रकारानंतर गंभीर नाराजी व्यक्त करत म्हणाला की, “एका फलंदाजाने पंचांकडे नो बॉलसाठी मागणी केली नाही पाहिजे. त्याने फक्त बॅटच्या सहायाने फलंदाजी करण्यावर लक्ष दिले पाहिजे.”
यावेळी बोलताना गंभीरने विराटवर फक्त टीका केली असे नाही. पुढे बोलताना त्याने विराटचे त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी कौतुक देखील केले. तो म्हणाला की, “विराटला माहिती आहे की, खेळाडूंसोबत भागीदारी कशी केली पाहिजे. त्याने सामन्याचा शेवटच चांगल्या प्रकारे केला. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर तोच हीरो ठरला. हे कारण आहे की, तो बाबर आझम, स्टीव स्मिथ, केन विलियमन्सन आणि जो रूट यांच्यापेक्षा वेगळा आहे.”
विराटला या सामन्यातील प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. ऑक्टोबर महिन्यात त्याच्या बॅटमधून अनेकदा मोठी धावसंख्या निघाल्याचे दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने ऑक्टोबर महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी त्याला नामांकन दिले आहे. त्याच्यासह दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रजा देखील या पुरस्कारासाठी नामांकित झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 वर्ल्डकपमध्ये रोहितच टॉपर! दिलशानला मागे टाकत केला ‘हा’ बलाढ्य विक्रम नावावर
कोहली ऍंड ऍडलेड कनेक्शन! विराटबाबत धोनीचा जुना व्हिडिओ का होतोयं व्हायरल?