इंग्लंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला आहे. हा किताब पटकावण्याची त्यांची दुसरी वेळ होती. रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या केलेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान संघाची दाणादाण उडवत 5 विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे इंग्लंड संघ मालामाल झाला आहे. इंग्लंड संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. चला तर इंग्लंड आणि स्पर्धेतील इतर संघांना किती रुपयांचे बक्षीस मिळाले आहे, जाणून घेऊया…
इंग्लंडच्या खिशात एवढे कोटी
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर इंग्लंड संघावर पैशांचा पाऊस पडला. विजेत्या इंग्लंड संघाची बक्षीस रक्कम (England Team Prize Money) म्हणून 13 कोटी रुपये देण्यात आले. उपविजेत्या पाकिस्तान संघाची बक्षीस रक्कम (Pakistan Team Prize Money)) देखील चांगली आहे. उपविजेता म्हणून पाकिस्तानला 6.44 कोटी रुपये मिळाले. याव्यतिरिक्त या दोन्ही संघाला सुपर 12 फेरीतील सामने खेळण्यासाठीही बक्षीस दिले.
आयसीसीने केले 45 कोटी रुपयांचे वाटप
आयसीसीने टी20 विश्वचषकाच्या सुरुवातीपूर्वी बक्षीस रक्कमेची घोषणा केली होती. टी20 विश्वचषकात जवळपास एकूण 45 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ठरवण्यात आली होती. ही रक्कम 16 संघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाटली. यानुसार टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 13 कोटी, उपविजेत्या संघाला 6.5 कोटी मिळाली. तसेच, उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना 3.26 कोटी रुपये दिले.
दुसरीकडे, सुपर 12 फेरीत एकूण 12 संघांपैकी 4 संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. सुपर 12 फेरीतून बाहेर होणाऱ्या इतर 8 संघांनाही आयसीसीकडून बक्षीस मिळाले. या संघांना आयसीसीकडून जवळपास 57.09 लाख रुपये मिळाले. तसेच, पहिल्या फेरीतून बाहेर होणाऱ्या संघांना 33.62 कोटी रुपये मिळाले.
भारताच्या वाट्याला किती?
उपांत्य सामन्यात पराभूत होऊनदेखील भारतीय संघावरही पैशांचा पाऊस झाला. भारतीय संघाला आधी उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी 4 लाख डॉलर मिळाले. सोबतच सुपर 12 फेरीत संघाने 5 पैकी 4 सामने जिंकले होते, त्यामुळे भारताला 1 लाख 60 डॉलर रुपये मिळाले. अशाप्रकारे भारतीय संघाला जवळपास एकूण 4.51 कोटी रुपये मिळाले. (T20 World Cup 2022 England vs Pakistan Team Final Match know Winner and Runner Up Prize Money)
टी-20 विश्वचषक 2022ची एकूण रक्कम- 45 कोटी
विजेता संघ- 1.6 मिलियन डॉलर (जवळपास 13 कोटी रुपये)
उपविजेता संघ- 0.8 मिलियन डॉलर (जवळपास 6.5 कोटी रुपये)
उपांत्य सामन्यात पराभूत होणारे संघ- 0.4 मिलियन डॉलर (जवळपास 3.26 कोटी रुपये)
सुपर 12 फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ- 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
सुपर 12 फेरीतून बाहेर होणारा प्रत्येक संघ- 70 हजार डॉलर (जवळपास 57.09 लाख रुपये)
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ- 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
पहिल्या फेरीतून बाहेर होणारा प्रत्येक संघ- 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 वर्ल्डकप: 2007 ते 2022, ‘हे’ आहेत फायनलमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेले खेळाडू, यादी पाहाच
नाचा रे! इंग्लंडमुळे भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सला उचकवले, थेट ‘नागिन’ गाण्यावर लावले ठुमके