आयसीसी टी20 विश्वषकातील (T20 World Cup) 19वा सामना रविवारी (9 जून) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी माजी पाकिस्तान कर्णधार राशिद लतिफ (Rashid Latif) यांना वाटत आहे की, भारतीय संघ यंदा रविवारी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करुन चांगली सुरुवात करेल. कारण भारताचा संघ प्रतिभावान आहे आणि त्या सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) दबाबाचा सामना करावा लागेल.
पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ पीटीआयशी बोलताना म्हणाला, “आमच्या सर्वांचे लक्ष्य (9 जून) रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे आहे. आम्ही या सामन्याची वाट पाहत आहोत. बाबर आझमवर चांगल्या कामगिरी ऐवजी या सामन्यात दबाव असणार आहे. परंतु त्यानं दबाव आल्यानंतर सांभाळायला शिकलं पाहिजे. बाबरनं विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याकडून शिकलं पाहिजे की, दबाव कसा हातळून काढायचा आणि सामना कसा पुढे न्यायचा?”
पुढे बोलताना लतिफ म्हणाला, “बाबर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. परंतु त्याच्या कर्णधारपदावर सारखे प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे त्याला भरपूर शिकायला लागणार आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर रोहितच्या कर्णधारपदात असणारा संघ रविवारच्या होणाऱ्या सामन्यात जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. भारताकडे उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. त्यामध्ये कुलदीप यादव एक असा खेळाडू आहे. जो फिट राहिला तर पूर्ण विश्वचषकात फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करु शकतो. भारतीय संघासाठी तो एक उत्तम फिरकीपटू आहे.
राशिद लतिफनं (Rashid Latif) पाकिस्तानसाठी 37 सामने खळले आहेत. त्यामध्ये त्यानं 1381 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या 150 राहिली आहे. त्यानं पाकिस्तानसाठी 1 शतकासह 7 अर्धशतक झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिकेनं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
आयपीएल 2024 मध्ये फ्लाॅप, टीम इंडीया मध्ये येताच परतला फाॅर्म!
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, रिकी पाँटिंगन केलं भारतीय संघाबद्दल मोठं वक्तव्य