ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) सोमवारी (24 ऑक्टोबर) बांगलादेश विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात सुपर 12चा सामना खेळला गेला. दुसऱ्या गटात असणाऱ्या या दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सुपर 12चा सामना होता. होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने अवघ्या 9 धावांनी विजय मिळवला. नेदरलॅंड्सने चांगलीच झुंज दिली. बांगलादेशच्या विजयामध्ये तस्किन अहमद याने महत्वाची भुमिका पार पाडली. तोच सामनावीराचा मानकरी ठरला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक गमावली असली तरी त्यांनी सामना आपल्या नावे केला. नेदरलॅंड्सने बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. अफिफ होसेन (38) आणि सलामीवीर नजमुल होसेन शांतो (25) यांनी सर्वाधिक धावा केल्या. यामुळे बांगलादेशने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 144 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलॅंड्सचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानायला तयार नव्हता.
नेदरलॅंड्सला शेवटच्या षटकात विजयासाठी 24 धावा पाहिजे होत्या. तेव्हा व्हॅन मीकरेन याने षटकार खेचत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते 20 षटकात सर्व विकेट्स गमावत 135 धावापर्यंतच मजल मारू शकले. त्यांच्याकडून कॉलिन एकरमन (Colin Ackermann) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार खेचत 62 धावा केल्या.
बांगलादेशचा मध्यमगती वेगवान गोलंदाज तस्किन अहमद याने उत्तम कामगिरी केली. त्याने 4 षटकात 25 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याला हसन महमूद याने योग्य साथ दिली. महमूदने 4 षटकात 15 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
Netherlands fight till the end but Bangladesh prove to be too good on the day 🙌#T20WorldCup | #BANvNED | 📝: https://t.co/hk1jHdMcZ9 pic.twitter.com/q3Sy1eklXJ
— T20 World Cup (@T20WorldCup) October 24, 2022
बांगलादेशचा हा ऑस्ट्रेलियातील केवळ दुसराच विजय ठरला. त्यांनी 2015च्या विश्वचषकात इंग्लंडला पराभूत केले होते.
या विजयामुळे बांगलादेश सुपर 12च्या दुसऱ्या गटाच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना नेदरलॅंड्स विरुद्धच आहे. बांगलादेशविरुद्ध नेदरलॅंड्सची कामगिरी पाहिली तर ते गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये उत्तम दिसले आहेत. यामुळे ते भारताला आव्हानही देऊ शकतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकांमध्ये विराटचं झळकतो! डिविलियर्सला मागे टाकत केला ‘हा’ अनोखा रेकॉर्ड
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे दोन गोलंदाज, दुसरे नाव आहे चकीत करणारे