इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने संपल्यानंतर टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. तसेच या स्पर्धेत भारतीय संघाची पहिली लढत पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी बाबर आजमने भारतीय संघाला चेतावणी दिली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याबाबत बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम म्हणाला की,”पाकिस्तान संघासाठी हा सामना एक घरगुती आयोजनासारखा आहे. कारण गेल्या १० वर्षांपासून पाकिस्तान संघ युएईमध्ये सामने खेळत आहे. इथे खेळणे आमच्यासाठी सामान्य गोष्ट आहे.”
यापूर्वी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार होते. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता बीसीसीआयने हे सामने युएई आणि ओमानमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय चाहत्यांना ही गोष्ट खटकू शकते
तसेच बाबर आजम पुढे म्हणाला की, “आम्ही न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत जोरदार सराव करू. या मालिकांमध्ये आम्ही आमचा दृष्टीकोन, तर ठीक करणारच आहे, यासह आम्ही जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून आम्हाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत जिंकण्याची लय टिकवून ठेवता येईल.”(T20 world cup is like a home event says babar azam)
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पात्रता सामने खेळले जातील. ज्यामधे ८ संघ मुख्या सुपर १२ फेरीत प्रवेश करण्यासाठी खेळतील. मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापूआ न्यू गिनी हे ८ संघ पहिल्या फेरीत खेळतील.
तसेच ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांनी सुपर १२ फेरीत थेट प्रवेश केलेला आहे. सुपर १२ ची फेरी २३ ऑक्टोबरपासून सुरु होईल.
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असे असतील दोन्ही गट
पहिली फेरी
अ गट : श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, नामीबिया
ब गट : बांगलादेश,स्कॉटलंड, ओमान,पापुआ न्यू गिनी
सुपर १२
गट १ : ऑस्ट्रेलिया,वेस्टइंडिज,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका, अ १, ब २
गट २:भारत,पाकिस्तान,न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ब १, अ २
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणानंतर विराटच्या सर्वाधिक धावा; ‘हे’ विक्रमही आहेत नावावर
२१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रंगलेला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना






