टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022मधील सुपर 12पासून खऱ्या अर्थाने स्पर्धेची सुरूवात होणार आहे. यातील पहिला सामना यजमान आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रतिस्पर्धी न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना 22 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे चाहते उत्सुक असून संपूर्ण क्रिकेटविश्व याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लेखामध्ये आपण भारताच्या एका अशा फलंदाजाविषयी जाणून घेऊ ज्याने टी20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानच्या नेहमीच नाकीनऊ आणले आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कारकिर्दीत चार टी20 विश्वचषक खेळले आहेत. यामध्ये भारत एकदाही जिंकला नसला तरी विराटने मात्र दोन वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने 2014 आणि 2016च्या सत्रात उत्तम कामगिरी करत हा पुरस्कार आपल्या नावावर केला.
विराट कोहली विरुद्ध पाकिस्तान (टी20 विश्वचषक)
पाकिस्तानविरुद्ध विराटची बॅट प्रत्येकवेळी तळपली आहे. तो पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक टी20 धावा करणारा फलंदाजही आहे. विराटने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 9 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 67.66च्या सरासरीने 406 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश असून तीन अर्धशतके टी20 विश्वचषकातच केली आहेत, तर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद 78 आहे. त्याने 2012च्या विश्वचषकात नाबाद 78, 2014मध्ये 54 आणि 2021मध्ये 57 धावा केल्या होत्या. तसेच त्याची सरासरीही उत्तम आहे. यामुळे तो 2022च्या विश्वचषकातही अशीच कामगिरी करण्याची शक्यता आहे.
टी20 विश्वचषकात विराटची कामगिरी
टी20 विश्वचषकात विराटने 21 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 19 डाव खेळताना 10 अर्धशतके केली. त्यामुळे त्याने 76.81च्या सरासरीने 845 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतके करणारा खेळाडू आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) (847) याच्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डोक्याला चेंडू लागल्याने पाकिस्तानी फलंदाज दवाखान्यात भरती, भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर?
टी20 दिग्गजांच्या पंक्तीत बसला आयर्लंडचा हिरो पॉल स्टर्लिंग; देशाचीही उंचावली मान