भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याचे नाव जगभरातील घातक वेगवान गोलंदाजांना घाम फोडत आहे. सूर्यकुमार 2022 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्याचा हा फॉर्म अजूनही सुरूच आहे. रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) माऊंट माऊंगनुई येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याने आपल्या बॅटमधून न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा आग ओकली. यामुळे त्याच्या नावावर जबरदस्त विक्रमाची नोंदही झाली. त्याने या विक्रमात केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने फलंदाजी करताना एकेवेळी 69 धावांवर 2 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने संघाचा डाव सावरला आणि जबरदस्त फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने यावेळी 51 चेंडूत नाबाद 111 धावा चोपल्या. या धावा चोपताना त्याने 7 षटकार आणि 11 चौकारही मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 217.65 इतका होता. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
Sensational SKY! 🎆
His 2⃣nd T20I 💯 👏 👏
This is a stunning knock 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/mIKkpD4WmZ #TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/XunZedIB9e— BCCI (@BCCI) November 20, 2022
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना एका डावात 200हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 100 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार अव्वलस्थानी आला. त्याने ही कामगिरी दोनदा केली आहे. यापूर्वी त्याने जुलै 2022मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात खेळताना 55 चेंडूत 117 धावा चोपल्या होत्या. या धावा त्याने 212.72च्या स्ट्राईक रेटने केल्या होत्या. अशी कामगिरी दोनदा करणारा तो एकमेव फलंदाज बनला.
त्याच्याव्यतिरिक्त संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे 3 फलंदाज आहेत. त्यामध्ये केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नावाचा समावेश आहे. या तिन्ही फलंदाजांनी फक्त एकदाच 200हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 100हून अधिक धावा चोपल्या होत्या. (T20I innings for India with 100 plus runs at SR 200 plus suryakumar yadav first in the list)
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिकवेळा 200+ स्ट्राईक रेटने 100+ अधिक धावा करणारे भारतीय
2 वेळा- सूर्यकुमार यादव*
1 वेळा- KL Rahul
1 वेळा- Virat Kohli
1 वेळा- Rohit Sharma
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा ‘सूर्य’ पुन्हा तळपला! टीम इंडियाच्या 6 बाद 191 धावा, कीवी फलंदाज मारणार का मैदान?
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित