Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जशास तसे! असे 3 प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर

जशास तसे! असे 3 प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर

November 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


क्रिकेट हा जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. परंतु इथे बऱ्याचदा अशा घटना घडताना दिसतात, ज्यामुळे क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणणे थोड्याफार प्रमाणात अयोग्य आहे. जेंटलमन गेमला खराब करणारी एक गोष्ट म्हणजे, स्लेजिंग. स्लेजिंग ही क्रिकेटच्या मैदानावरील नेहमीची गोष्ट झाली आहे.

स्लेजिंगची खरी सुरुवात त्यावेळी झाली जेव्हा क्रिकेटचा जनक असलेल्या इंग्लंडच्या ग्रेसने लवकर बाद दिल्यामुळे अंपायरला सुनावले होते. प्रेक्षक इथे माझी फलंदाजी बघायला आले आहेत, तुझी बोटं नाहीत. आणि तो परत फलंदाजी करायला लागला. पण एकदा जेव्हा चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला, तेव्हा तो अंपायरला म्हणाला, आज हवा खूपच जोरात आहे, बघा यष्ट्या पण पडल्या. पण अंपायर सुद्धा कमी नव्हते. ते म्हणाले, हो ना खूपच जोरात आहे आज हवा आणि ती तुम्हाला पॅव्हेलियनपर्यंत लवकर जायला मदत करेल.

भारतीय खेळाडूंना सुद्धा बऱ्याच वेळा स्लेजिंगचा सामना करावा लागला आहे आणि त्यांनी प्रत्येकवेळी त्याच खणखणीत भाषेत उत्तरही दिलेलं आहे. आज आपण अशा ३ घटना बघणार आहोत, ज्यात भारतीय खेळाडूंनी स्लेजिंगला खणखणीत उत्तर दिलेलं आहे.

१) एस श्रीसंत विरुद्ध आंद्रे नील-
२००६ चा भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा बऱ्याच क्रिकेटप्रेमींना लक्षात असेल. पहिल्या कसोटीत भारतीय संघाने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर १६५ धावांनी आघाडी घेतली आणि त्यानंतर श्रीसंतच्या ५ विकेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा डाव ८४ धावांवर गुंडाळला. पण खरा रोमांच यानंतर सुरू झाला.

दुसऱ्या डावात जेव्हा श्रीसंत फलंदाजी करायला आला तेव्हा भारतीय संघाची अवस्था ९ बाद २१९ अशी होती. मैदानावर येताच श्रीसंत गोलंदाजी करणाऱ्या आंद्रे नीलवर भडकला. आंद्रे नील विकेट घेण्यासाठी स्लेजिंग करत होता, पण श्रीसंतनी पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकून आंद्रे नीलला सणसणीत उत्तर दिलं. भारतीय संघाने हा सामना १२३ धावांनी आपल्या नावावर केला होता.

२) युवराज सिंग विरुद्ध अँड्र्यू फ्लिंटॉफ-
२००७ मध्ये भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज युवराज सिंगचे ६ षटकार क्वचितच कोणी क्रिकेटप्रेमी विसरू शकला असेल. जेव्हा केव्हा युवराज सिंगबद्दल बोललं जात तेव्हा सर्वात पहिलं त्याच हे शानदार प्रदर्शन आठवतं. कमालीची गोष्ट ही आहे की, हे ६ ही षटकार स्लेजिंगचा परिणाम होते. त्याआधी १७ व्या षटकात युवराजने फ्लिंटॉफला २ चौकार लगावले होते. त्यामुळे फ्लिंटॉफ आणि युवराजमध्ये बाचाबाची झाली. फ्लिंटॉफ त्याच्या शॉटला वाईट बोलला. त्यावर युवराजला राग आला आणि त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूवर ६ षटकार मारून स्लेजिंगचा हिशोब चुकता केला होता.

३) हरभजन सिंग विरुद्ध शोएब अख्तर-
भारत पाकिस्तान सामन्यात स्लेजिंग होणं ही काय नवीन गोष्ट नाही. कोणी काहीही म्हणो किंवा कितीही खिलाडूवृत्तीच्या गोष्टी बोलूदेत, पण भारत पाकिस्तान सामना एखाद्या युध्दापेक्षा कमी नसतो. भारत पाकिस्तान सामन्यात अनेकवेळा स्लेजिंग झाले आहे. आपण आत्ता २०१० मध्ये आशिया कपदरम्यान हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यामध्ये झालेले स्लेजिंग बघणार आहोत.

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने २६७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानची गोलंदाजी आणि भारताची फलंदाजी बघता हा सामना खूप रोमांचक होता. शेवटच्या षटकात भारताला जिंकण्यासाठी ७ धावांची गरज होती. गौतम गंभीर आणि हरभजन सिंग खेळपट्टीवर टिकून होते.
१९ वे षटक टाकायला पाकिस्तान चा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर आला आणि त्याने हरभजन सिंगला उचकवण्याचा प्रयत्न केला. पण हरभजन सिंगने या स्लेजिंगच उत्तर जोरदार षटकार मारत दिलं आणि शेवटी हा सामना भारताने जिंकला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ठरलं एकदाचं! खुद्द वडिल सुनील शेट्टीने केले केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य
वाढदिवस विशेष: भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगटबद्दल खास 5 गोष्टी घ्या जाणून


Next Post
Zidane & Ronaldo & Karim Benzema

मोठी बातमी! फिफा विश्वचषकाच्या 44 वर्षात पहिल्यांदाच 'अशी' अप्रिय घटना, सर्वोत्तम खेळाडू बाहेर

Photo Courtesy: Twitter/ICC

क्रिकेट इतिहासातील 'तीन दिग्गज'; ज्यांनी आपली कारकीर्द विनाकारण लांबवली

Ind-vs-Nz

यजमानांनी जिंकला टॉस! फलंदाजीसाठी टीम इंडियाला केले पाचारण

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143