टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान संघाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात त्यांना कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव स्वीकारावा लागाल, तर दुसऱ्या सामन्यात गुरुवारी (27 ऑक्टोबर) झिम्बाब्वेकडून पाकिस्तान पराभूत झाला. पाकिस्तानच्या तुलनेत झिम्बाब्वे संघ तसा पाहिला तर दुबळाच आहे. पण गुरुवारी पर्थवर त्यांनी बलाढ्य पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हक याने आता संघातील गोलंदाजांवर या पराभाचे खापर फोडले आहे
मिसबाह उल हक (Misbah-ul-Haq) यांच्या मते पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियातील परिस्थितीला साजेशी गोलेंदाजी करत आली नाहीये. त्यांच्या मते पाकिस्तानने शॉर्ट चेंडू टाकले असते, तर जिम्बाब्वेला इतक्या धावा करता आल्या नसत्या. झिम्बाब्वेने सुरुवातीच्या षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात दिली होती. शाहीन आफ्रिदीने टाकेलेल्या पहिल्या षटकात झिम्बाब्वेने 14 धावा केल्या होत्या. मिसबाहच्या मते पाकिस्तानने सुरुवातीला अपेक्षेपेक्षा जास्त धावा खर्च केल्यामुळे संघाला त्याची किंमत पराभवाने मोजावी लागली.
पाकिस्तानी गोलंदाजांनी शॉर्ट चेंडू टाकले पाहिजे होते –
पाकिस्तानमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आम्ही सुरुवातीला झिम्बाब्वेला एकही शॉर्ट चेंडू टाकला नाही. आम्हाला माहिती होते की, शॉर्ट चेंडू खेळताना त्यांना अडचण येते. त्यांना (पाकिस्तानी गोलंदाज) वाटले चेंडू पुढे टाकून सिंग करू आणि विकेट मिळवू. तुम्हाला आदी फलंदाजांना दबावात आणायचे असते. त्यांना घाबरवायचे असते. त्यांनी सुरुवातीचे तीन-चार चौकार एकदी भेट म्हणून दिले. जर तुम्ही मोठ्या स्पर्धांमध्ये अशा चुका वारंवार करत असाल, तर मग सामना जिंकू शकणार नाही. आम्हाला माहिती होते झिम्बाब्वे संघ कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्ये कोंडी करतो. कारण त्यांचे गोलंदाजी आक्रमण खूप अप्रतिम आहे.”
दरम्यान, पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर झिम्बाब्वे एक धावा राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये झिम्बाब्वने 8 विकेट्सच्या नुकसानावर 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 129 धावांपर्यंत मजल मारू शकला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाला आता पुढचे सर्वच्या सर्व सामने जिंकावे लागतील. तेव्हा कुढे संघ उपांत्य सामन्याच्या शर्यतीत कायम राहू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सामना रद्द झाल्याने गुणतालिकेत तळाशी असलेल्या ऑस्ट्रेलियाला फायदा, थेट ‘या’ स्थानावर घेतली उडी
‘दोन तास हा इंग्रजीचं व्याकरण चेक करत होता’, झिम्बाब्वेची प्रशंसा करताच चाहत्यांकडून कामरान अकमल ट्रोल