भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर जाऊन 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खूप महत्वाचा ठरू शकतो. तत्पूर्वी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट याने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहवर कमेंट केली. पण त्याच्यावर केलेली कमेंट त्याला चांगलीच भारी पडली आहे. आता त्याने त्याचं एक्स अकाऊंट डीएक्टिव केलं आहे. डेली मेल सोबतच्या इंटरव्ह्यू मध्ये बेन डकेट म्हणाला होता की, जसप्रीत बुमराहचा सामना केल्यानंतर त्याला अंदाज आला आहे की, या वर्षाच्या शेवटी इंग्लंड मध्ये होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्याकडून काय आशा ठेवली पाहिजे.
डेली मेल सोबतच्या इंटरव्ह्यूमध्ये बेन डकेटने जसप्रीत बुमराह शिवाय मोहम्मद शमीचे कौतुक केले. बेन डकेटचे म्हणणे होते की, मी याआधीही 5 कसोटी सामन्यात त्याचा सामना केला आहे. मला त्याचे कौशल्य माहित आहेत. यामुळे मला काही आश्चर्य वाटणार नाही. पण हे नक्की आव्हानात्मक असेल की, सुरुवातीमध्ये जर मी त्याचा सामना करू शकलो तर मी पुढे जास्त धावा करू शकतो. बेन डकेटने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना हा दावा केला नाही की, तो जसप्रीत बुमराह विरुद्ध चांगल प्रदर्शन करेल. तसेच त्याने बाकीच्या लोकांच्या कमेंट्स विचारपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला.
सोशल मीडियावर बेन डकेटच्या रिप्लायचा स्क्रीनशॉट खूप वायरल होत आहे. त्यानंतर त्याने त्याचं एक्स अकाउंट डीऍक्टिव्ह केलं आहे. त्याच्या इंटरव्यू मध्ये तो म्हणाला आहे की, भारतीय संघाला घरेलू मैदानात पराभूत करणं खूप अवघड आहे. पण जर टीम इंडिया परदेशातल्या दौऱ्यावर असेल तर त्यांना पराभूत करणे तितके अवघड नसणार आहे. तसेच तो म्हणाला, घरेलू मैदानावर खेळणारा भारतीय संघ आणि परदेशात खेळणारा भारतीय संघात खूप अंतर आहे. त्याचं म्हणणं आहे की ते भारतीय संघाला हरवण्यात यशस्वी ठरतील.






