भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. शुक्रवारी (४ फेब्रुवारी) भारतीय संघाने या आगामी मालिकेसाठी सरावाला सुरूवात केली. एकदिवसीय संघाच्या नियमित कर्णधाराच्या रूपात रोहित शर्माची ही पहिली एकदिवसीय मालिका असणार आहे.
बीसीसीआयने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करून चाहत्यांपर्यंत संघाने सरावाला सुरूवात केल्याची माहिती पोहोचवली. बीसीसीआयच्या या पोस्टमध्ये चार फोटो आहेत. त्यातील पहिल्या फोटोत संपूर्ण संघ दिसत आहे. कर्णधार रोहित त्यांना काहीतरी सुचना करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत माजी कर्णधार विराट कोहली हातात बॅट घेऊन चालल्याचे दिसत आहे. तिसऱ्या फोटोत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे, तर चौथ्या फोटोत वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर गोलंदाजी करताना दिसत आहे.
भारतीय संघासाठी मालिकेतील पहिला सामना खास असणार आहे. पहिल्या सामन्यानंतर भारत आपले १००० एकदिवसीय सामने पूर्ण करणार आहे. हा विक्रम करणार भारत जगातील पहिला संघ ठरेल. नुकत्याच पार पडलेल्या भारतीय संघाच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रोहितला भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले गेले होते. पण, दुखापतीमुळे त्याला अचानक दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती. अशात वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो एकदिवसीय संघाच्या नियमित कर्णधारपदाच्या कारकिर्दीला सुरुवात करेल.
https://twitter.com/BCCI/status/1489608096481935361?s=20&t=pRrv7CRu9HCjyNdZw4g4oQ
दरम्यान, भारतीय संघ एकदिवसीय मालिकेपूर्वी तीन दिवसांच्या विलगीकरणात होता. विलगीकरणाच्या कालावधीत केल्या गेलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये अनुभवी सलामीवीर शिखर धवन, सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याव्यतिरिक्त राखीव खेळाडूंमधील नवदीप सैनी आणि सपोर्ट स्टाफच्या चार सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.
एकदिवसीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल पहिल्या एकदिवसीय सामन्या विश्रांतीवर आहे. तर शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोना बाधा झाली आहे. अशात बीसीसीआयने सलामीसाठी मयंक अगरवालला संघात सामील केले आहे. मयंक सध्या तीन दिवसांच्या विलगिकरणात आहे. मयंक पहिल्या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करेल, अशी शक्यता आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हूडा, वाशिंगटन सुंदर, लोकेश राहुल, रिषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
महत्वाच्या बातम्या –
गांगुलींच्या विधानामुळे पुन्हा वाद! आता बंगाल क्रिकेट संघटना म्हणतेय…
“त्याला कर्णधार बनवणे चुकीचा निर्णय ठरेल”
हार्दिकचा ‘कमबॅक प्लॅन’ तयार! आयपीएलआधी ‘या’ स्पर्धेत गाळणार घाम






