जसप्रीत बुमराह टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा पाठीचा कणा म्हणून भूमिका बजावला होता. बुमराहने भारतीय संघाला विश्विजेता बनवण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान बुमराहला त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे या स्पर्धेतील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब देण्यात आला. मात्र याआधी टीम इंडियाला दुखापतीमुळे 2022 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत बुमराहला मुकावे लागले होते. बुमराहची दुखापत टीम इंडियासाठी खूप घातक ठरली. आता संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांबरे यांनी बुमराहच्या दुखापतीबद्दल सांगितले.
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर पारस महांबरेचा टीम इंडियासोबतचा करार संपला आहे. आता गोलंदाजी प्रशिक्षकाने बुमराहचे कौतुक केले आणि तो दुखापतीतून कसा परतला हे सांगितले. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले की, पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर बुमराहइतका किंवा अधिक प्रभावी होताना मी कोणी पाहिले नाही.
‘द हिंदू’शी बोलताना पारस महांबरे म्हणाले, पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करतना बुमराह इतका अधिक प्रभावी होईल असे कोणाला वाटले नव्हते. मी माझ्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक गोलंदाज पाहिले आहेत. पण बुमराहसारखा गोलंदाज पुन्हा होणे नाही. पुनरागमनाचे श्रेय पूर्णपणे त्याला जाते. त्या दुखापतीतून तो ज्याप्रकारे परतला ते पाहून खूप आनंद झाला. मी अनेक जणांना पाठीवर शस्त्रक्रिया करून परत येताना पाहिले आहे. पण तो पुन्हा आधी सारखे त्यांच्याकडून प्रभावी गोलंदाजी पाहिले नाही, पण बुमराहने याउलट काम केले आहे”.
2024 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात बुमराहचे मोठे योगदान होते. बुमराहने अनेक सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. स्पर्धेतील अनेक सामन्यांमध्ये बुमराहने आवश्यक वेळी विकेट घेत संघाला विजयापर्यंत नेले.
बुमराहने स्पर्धेतील 8 सामन्यात 8.27 च्या उत्कृष्ट सरासरीने 15 विकेट घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बुमराहला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब देण्यात आला. विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभात बुमराहचे भरभरून कौतुक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”
मेस्सी दुखापतग्रस्त…तरीही हार मानली नाही! अर्जेंटिनानं सलग दुसऱ्यांदा जिंकला कोपा अमेरिकाचा खिताब