---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीचे चेन्नईत आगमन; फोटो व्हायरल

---Advertisement---

चेन्नई। भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बुधवारी(२७ जानेवारी) रात्री उशीरा चेन्नईला पोहचला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मुलीच्या जन्मानंतर विराटची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. चेन्नईत आल्यानंतर विराटची कोरोना चाचणी झाली असून तो आता क्वारंटाईन झाला आहे, असेही समजत आहे.

विराटने मागील महिन्यात मुलीच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेतली होती. त्यामुळे तो पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला होता. त्याला ११ जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर आता १५ दिवसांनी विराट पुन्हा भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्यास सज्ज झाला आहे.

त्याचा बुधवारी रात्री मुंबई विमानतळावरुन चेन्नईला रवाना होतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. तसेच त्याचे चेन्नईला पोहचल्याचा दावा करणारे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/kohlifanacc/status/1354638772973965316

https://twitter.com/prakx_tweetz/status/1354632623230918656

विराटच्या आधी भारतीय संघातील काही खेळाडूही मंगळवारी तर काही बुधवारी चेन्नईत पोहचले असून ते देखील सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत.

इंग्लंडचा संघही बुधवारी सकाळी चेन्नईला पोहचला असून त्यांचीही कोरोना चाचणी झाली. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असून ते देखील भारतीय खेळाडूंप्रमाणे हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत.

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना ६ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहाणे अनिवार्य आहे. त्यानंतर ते २ फेब्रुवारीपासून सरावाला सुरुवात करु शकतात.

दोन्ही संघात स्टार खेळाडूंचे पुनरागमन

भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या २ कसोटी सामन्यांसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. इंग्लंड संघाने जॉनी बेअरस्टो आणि सॅम करनला विश्रांती दिली आहे तर जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, रॉरी बर्न्स यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

तसेच भारतीय संघातही विराटचे मुलीच्या जन्मानंतर संघात पुनरागमन झाले आहे. तर हार्दिक पंड्या आणि इशांत शर्मा देखील कसोटी संघात परतले आहेत. त्याचबरोबर अक्षर पटेल या अष्टपैलू क्रिकेटपटूलाही भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे.

तीन ठिकाणी होणार सामने –

इंग्लंडचा भारत दौरा कोरोनाच्या संकटामुळे तीन ठिकाणीच होणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचे पहिले २ सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत. त्यानंतर शेवटचे २ कसोटी सामने अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. यानंतर अहमदाबाद येथेच ५ टी२० सामने होतील. त्यानंतर पुण्यात ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

महिपाल लोमरोलच्या विस्फोटक खेळीमुळे राजस्थानची बिहारचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक

आयपीएल लिलावात सहभागी होण्याआधी संघसदस्यांना ‘ही’ गोष्ट करणे अनिवार्य

आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा कायम; विराट व रोहित आहेत ‘या’ क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---