भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. याबरोबर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. या पराभवात सर्वाधिक टीकेचा सामना जर कोण करत असेल तर कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे.
चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने फक्त १ धाव केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता नाही आले. यानंतर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीवर टीकांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. यावर कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणे याला समर्थन देत पुढाकार घेतला आहे. त्याने अजिंक्य रहाणेला कठीण काळात संघासाठी धावा करणारा फलंदाज म्हटले आहे.
अजिंक्य रहाणे बद्दल विराट कोहली म्हणाला…
कर्णधार विराट कोहलीला जेव्हा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबद्दल प्रश्न करण्यात आला, तेव्हा तो म्हणाला,” जर तुम्ही खोदून काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला काहीच हाती नाही लागणार आहे. चेतेश्वर पुजारासोबत अजिंक्य रहाणेसुद्धा भारतीय कसोटी संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. तो आमच्यासोबत असणार आहे. आम्हाला त्याच्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा त्याने शतक झळकावले होते. तुम्ही आकड्यांबद्दल काहीही म्हणाल, परंतु आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका जिंकली होती.”
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
विराट कोहलीने केले अजिंक्य रहाणेचे समर्थन
विराट कोहली पुढे म्हणाला, “आतापर्यंत एकच कसोटी सामना झाला आहे. पहिल्या डावात तो चौकार मारण्याचा प्रयत्न करत होता. जो रुटने उत्कृष्ठ झेल पकडला होता. जर अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात धावा केल्या असत्या तर हे बोलणे होत नसते. आता आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. एक कसोटी संघ म्हणून आम्हाला चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे.”
अजिंक्य रहाणेने मेलबर्न कसोटी सामन्यात शतक झळकावल्या नंतर ७ डावात एकही अर्धशतक करता आले नाही. सध्या रहाणे बरोबरच रोहित शर्मासुद्धा फॉर्ममध्ये नाही. चेन्नई कसोटीच्या दोनही डावात रोहित शर्मा सुद्धा फ्लॉप राहिला आहे. भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकायची असेल तर या दोन्ही खेळाडूंचे फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–मॅचविनर कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये का संधी दिली नाहीस?, कर्णाधार कोहली म्हणतोय
–टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याची समीकरणं बदलली
–जे कुणाला जमलं नाही ते रुटने करुन दाखवलं! विक्रमांचे विक्रम करताना मोडला मुंबई कसोटीत झालेला तो विक्रम
–व्हिडीओ- कर्णधार विराट कोहली भडकला, थेट पंचांकडे केली जोफ्राच्या त चुकीची त्या तक्रार






