सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले दोन सामने आपल्या नावे करत भारताने विजयी आघाडी घेतलीये. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये न्यूझीलंड संघाला नुकसान सोसावे लागले असून, त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र, मालिकेतील अखेरचा सामना जिंकून तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला थेट पहिल्या स्थानी जाण्याची संधी असेल.
भारतीय संघाने हैदराबाद व रायपुर येथील पहिले दोन सामने जिंकत विजयी आघाडी घेतली. त्यानंतर आयसीसीने नवी वनडे क्रमवारी जाहीर केली. नव्या क्रमवारीत न्यूझीलंड संघाला झटका बसला असून, पहिल्या स्थानावरून त्यांना हटवत इंग्लंडने अव्वलस्थानी झेप घेतली. सध्या इंग्लंड, न्यूझीलंड व भारत या तिन्ही देशांचे रेटिंग गुण 113 इतके आहेत. मात्र, सरस गुणांच्या आधारे इंग्लंड पहिल्या स्थानी आहे.
न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा वनडे सामना भारतीय संघाने एका धावेने जिंकला तरी, भारतीय संघ या यादीत पहिल्या स्थानी पोहोचेल. भारतीय संघ हा सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. कारण, फेब्रुवारी 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ अखेरच्या वेळी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचलेला.
नव्या वनडे क्रमवारीचा विचार केल्यास पहिल्या तीन क्रमांकानंतर ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान संघ पहिल्या पाचमध्ये आहे. त्यानंतर अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व वेस्ट इंडिज यांचा क्रमांक लागतो. टी20 क्रमवारीत भारतीय संघाचा पहिला तर, कसोटी क्रमवारीत दुसरा क्रमांक कायम आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून कसोटी क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर जाण्याचा भारतीय संघ यानंतर प्रयत्न करताना दिसेल.
(Team India Chance To Snatch Top Spot In ODI Rankings After Indore ODI Win)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टंप्स मागे सोडून स्टीव स्मिथने मारला अनोखा शॉट, चेंडू टाकण्याआधी बॉलरही गोंधळला
केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी