भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आयपीएल व्यतीरिक्त आता दुलीप ट्राॅफी मध्ये एकमेकांविरुद्ध भिडताना पहायल मिळणार आहेत. साधारणत: 14 वर्षांनंतर आपल्या हे आश्चर्यकारक दृश्य पहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. एका संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करू शकतो आणि दुसऱ्या संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करू शकतो. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहच्या चेंडूना सामोरे जाईल तर तो बुमराहला कसा खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आगामी दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरूवात होईल. तर 24 सप्टेंबरपर्यंत हा मालिका खेळवली जाणार आहे. यावेळी बीसीसीआयने भारताच्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यास सांगण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंनाही दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून बांग्लादेश दौऱ्यासाठी तयारी चांगली होऊ शकेल. दुलीप ट्राॅफी स्पर्धा यापुढे झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार नाही. त्यामुळे एकूण चार संघ जाहीर केले जातील. ज्याचे नाव भारत अ, ब, क आणि ड असेल. त्यामुळे रोहित शर्मा एका संघाचे नेतृत्व करू शकतो आणि जसप्रीत बुमराह दुसऱ्या संघाचे नेतृत्व करू शकतो.
रोहित शर्माकडे भारत अ आणि जसप्रीत बुमराहकडे भारत ब संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. रोहित शर्माच्या संघात देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिळक वर्मा, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि ईशान किशनसारखे खेळाडू असू शकतात.
बुमराहबद्दल बोलायचे झाले तर यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि उमरान मलिक सारखे खेळाडू त्याच्या संघात खेळू शकतात. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी भारत अ आणि ब संघातील अशी संभाव्य प्लेइंग 11 खेळण्याची शक्यता आहे.
भारत अ: रोहित शर्मा (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिळक वर्मा, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, इशान किशन, शम्स मुलानी, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.
भारत ब; – जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, उमरान मलिक, आकाशदीप सिंग, साई किशोर आणि केएस भरत
हेही वाचा-
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्स या 4 खेळाडूंना ठेवणार कायम, परदेशी दिग्गजांचाही समावेश
वयाच्या 40 व्या वर्षी भारतीय विकेटकीपरची ‘घरवापसी’, देशांतर्गत हंगाम खेळण्यास तयार, निवृत्तीबाबतही केलं मोठं वक्तव्य!
विराट कोहलीचे 14 वर्ष जुने ट्विट व्हायरल! चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया; दुलीप ट्राॅफीशी खास संबंध?