भारत आणि बांग्लादेश संघात तिरंगी टी २० मालिकेतील दुसरा सामना आज कोलंबो येथे होत आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Match 2. India win the toss and elect to field https://t.co/C7IbAXQwjH #IndvBan
— BCCI (@BCCI) March 8, 2018
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्सने पराभव स्वीकारला आहे.
त्यामुळे बांग्लादेश विरुद्ध होणाऱ्या आजच्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
आजपर्यंत भारत आणि बांग्लादेशमध्ये ५ टी२० सामने झाले आहेत. या पाचही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.
अशी आहे टीम इंडिया:
रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रीषभ पंत, वाॅशिग्टन सुंदर, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकत, युझवेंद्र चहल