कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतातही वेगाने वाढत आहे. या व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२४ मार्च) देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती.
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएल रद्द होण्याची शक्यता आहे. याचकारणामुळे सर्व भारतीय क्रिकेटर सध्या घरी आहेत. यातील बरेच क्रिकेट हे आता सोशल मिडीयावर सतत काहीतरी पोस्ट करत आहेत.
अशातच टीम इंडियाचे स्टेंथ व कंडिशनिंग प्रशिक्षक निक वेबने फिजीओ नितीन पटेलबरोबर मिळून खेळाडूंसाठी एक इनडोअर वर्कआऊट प्लॅन केला आहे. यामुळे सध्या घरी असलेले खेळाडू फक्त आराम नाहीतर वर्कआऊटही करतील.
हे वर्कआऊट खेळाडूंना रोज करावे लागणार असून त्यामुळे ते फीट रहाणार आहेत.
“टीम इंडियाचे खेळाडू जे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत असो, सर्वांना हे वर्कआऊट करावे लागणार आहे. याचबरोबर याची पुर्ण माहिती निक वेब व नितीन पटेल यांना द्यावी लागणार आहे.” असे बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे.
“हा वर्कआऊट प्लॅन प्रत्येक खेळाडूचा विचार करुन तयार करण्यात आला आहे. यामुळे खेळाडूंचे शरीर पुर्णपणे मजबूत रहाणार आहे. तसेच त्यांच्या खांद्यावर व मनगटावर याचा चांगला परिणाम दिसेल,” असेही या सुत्रांनी पुढे सांगितले आहे.
पुढील क्रिकेट मालिका कधी सुरु होतील याचा सध्यातरी काहीही अंदाज नाही. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट मालिका रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
सध्याच्या ट्रेडिंग बातम्या-
– या क्रिकेटरने सांगितले, कोरोना व्हायरसमुळे त्याला झालेले फायदे
–सीएसके आणि आरसीबीमधील फरक त्याने सांगितला, याचमुळे आरसीबी जिंकत नाही आयपीएल
– अखेर फिरकीपटू आर अश्विनने बदललं आपलं नाव
– जिथं ऑलिंपिक्स नाही टिकलं तिथं आयपीएलचं काय घेऊन बसलाय
– टी२० विश्वचषकाची विकेट पडणं जवळपास पक्कं, या दिवशी होणार…
– टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब