---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी रिषभ आणि शार्दुलच्या संघात रंगला ‘अजब’ सामना

On: मंगळवार, जुलै 27, 2021 11:41 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उतरेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर मिळालेली २० दिवसांची सुट्टी संपवून सर्व भारतीय खेळाडू पुन्हा एकदा बायो-बबलमध्ये सामील झाले आहेत. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा दुसरा सराव सामना बुधवारपासून (२८ जुलै) सुरू होईल. तत्पूर्वी, भारतीय संघ मैदानावर एका वेगळाच सराव प्रकार करताना दिसून आला.

भारतीय खेळाडूंचा नवा सराव प्रकार
सध्या भारतीय क्रिकेट संघ डरहॅम येथे आहे. येथेच काउंटी एकादश संघाविरुद्ध संघाने पहिला सराव सामना खेळला होता. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडू एक वेगळा सराव प्रकार करताना दिसत आहेत. संघातील खेळाडूंना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले.

या दोन्ही संघांचे कर्णधार अनुक्रमे रिषभ पंत व शार्दुल ठाकूर यांना बनविण्यात आले होते. खेळाच्या नियमानुसार चेंडू एकाच हाताने झेलावा लागेल. ज्या हाताने चेंडू झेलला आहे, त्याच्या विरुद्ध हाताने तो आपल्या सहकार्याकडे पास करायचा. अशाप्रकारे सात पास झाल्यानंतर तो चेंडू एका विशिष्ट जागेमध्ये गोल म्हणून टाकायचा. खेळाचे नियम संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. संघातील बरेचशे खेळाडू या खेळामध्ये सामील झालेले दिसले.

भारतीय संघ खेळणार इंट्रा स्क्वाड मॅच
भारतीय संघ २८ जुलैपासून इंट्रा स्क्वाड मॅच खेळणार आहे. संघाने पहिला सराव सामना काउंटी एकादश संघाविरुद्ध खेळला होता. या सामन्यामध्ये संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंनी सहभाग घेतला नव्हता. केएल राहुल, रविंद्र जडेजा व उमेश यादव यांनी या सामन्यामध्ये प्रभावी कामगिरी केलेली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथे सुरुवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनी-अय्यर दिसले फुटबॉल खेळताना, विराटने इंग्लंडवरून केली ‘ही’ मागणी

कृणाल कोरोनाबाधित आढळल्याने चिंतेत पडली इंग्लंडमधील ‘विराटसेना’, ‘हे’ आहे कारण

‘कृणाल पंड्याने एकहाती मालिका संपवली’, दुसरा टी२० सामना पुढे ढकलल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---