वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाला प्रारंभ झाला. यजमान असलेला भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाला सुरुवात करेल. या विश्वचषकासाठी भारतीय संघाला खास जर्सी देखील मिळाली आहे. त्यानंतर आता विश्वचषकासाठी भारतीय संघाला नवी ट्रेनिंग किट देखील मिळाली. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
याच वर्षी भारतीय क्रिकेट संघाला नवा किट प्रायोजक म्हणून आदिदास आंतरराष्ट्रीय कंपनी लाभली आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या वनडे, कसोटी व टी20 अशा तिन्ही संघांसाठी वेगवेगळ्या जर्सी मिळाल्या होत्या. विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या जर्सीवर खास तिरंगा देखील बनवण्यात आला आहे. ही जर्सी मोठ्या प्रमाणात पसंत केली जातेय.
Team India in the practice session in the new training kit. pic.twitter.com/BMLx86GunD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
त्यानंतर आता भारताचे नवी ट्रेनिंग किट देखील समोर आलेली आहे. आदिदासने बनवलेली ही जर्सी पूर्णपणे भगव्या रंगाची असून, खांद्यावर तीन पांढऱ्या पट्ट्या दिसून येतात. याव्यतिरिक्त समोरच्या बाजूला बीसीसीआयचा लोगो व प्रायोजक कंपनीचे नाव आहे.
या जर्सीवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, ‘फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांचे स्वागत आहे’. दुसऱ्या एकाने लिहिले, ‘भोले बाबाची कावड घेऊन चालले आहात का?’
तर काहींनी भगवा रंग हा खूलून दिसत असल्याचे म्हटले. तर काहींनी कमेंट करताना संत्र्याची इमोजी पोस्ट केली आहे.
यापूर्वी भारतीय संघाचे ट्रेनिंग किट जास्त करून निळ्या रंगाची दिसून येत असत. 2011 विश्वचषकावेळी देखील भारताची ट्रेनिंग किट काहीशी भगव्या रंगाची होती. तसेच, मागील विश्वचषकात भारताने इंग्लंड विरुद्ध भगव्या आणि निळ्या रंगाची किट सामन्यात वापरलेली.
(Team India New Training Kit Orange Colours Fans Troll Badly)