भारतीय क्रिकेट संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ आपली उपस्थिती दर्शवेल. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली असून, ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमूळे विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. अशात आता संघ व्यवस्थापन विश्वचषकासाठी प्लॅन बी आखत असल्याचे दिसतेय.
विश्वचषकात भारतीय संघाची गोलंदाजी कमजोर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बुमराहच्या बाहेर जाण्याने भारतीय संघाला एका अनुभवी गोलंदाजाची कमतरता नक्की जाणवेल. त्याच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करेल. त्याचवेळी संघात युवा अर्शदीप सिंग, हर्षल हेच मुख्य वेगवान गोलंदाज शिल्लक आहेत. बहुमताच्या जागी मोहम्मद शमी अथवा दीपक चहर यापैकी एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
फिरकी गोलंदाजी विभाग त्यामानाने अधिक अनुभवी आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर त्यांना तितकीशी मदत मिळणार नाही. रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल व अक्षर पटेल हे भारतीय संघाकडे पर्याय आहेत.
एकंदरीत विचार केला गेल्यास भारतीय संघाला या विश्वचषकात अष्टपैलू हार्दिक पंड्या याची अधिक गरज पडेल. हार्दिक किती प्रभावी गोलंदाजी करतो यावर भारतीय संघाचे बरेचशे यश अवलंबून असेल. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन भुवनेश्वर कुमार, अर्शदीप, हार्दिक, अक्षर, एक फिरकीपटू आणि बुमराहच्या जागी येणारा गोलंदाज अशा गोलंदाजांना संधी देण्याची दाट शक्यता आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी