---Advertisement---

टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल, चाहत्यांनी केलं जंगी स्वागत

On: गुरूवार, जुलै 4, 2024 8:27 AM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय चाहते चॅम्पियन भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक ट्रॉफीसह देशात परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता आज म्हणजेच 4 जुलैला सकाळी रोहित शर्माची चॅम्पियन टीम दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. भारतीय संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक ट्रॉफीसह सकाळी 6:09 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती. चॅम्पियन संघ आणि ट्रॉफीची झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला होता. सर्व चाहते आनंदाने भरून आले. ते भारत माता की जयच्या घोषणा देत होते. त्यांच्या हातात तिरंगा होता.

टी20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर, बेरील वादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसची राजधानी ब्रिजटाऊन येथील हॉटेलमध्ये अडकली होती. त्यामुळे सर्व विमान प्रवास बंद करण्यात आला. वादळ संपल्यानंतर टीम इंडियाला विशेष विमानाने परत आणण्यात आले.

भारतीय संघाचे आजचे वेळापत्रक

– पंतप्रधानांसोबत नाश्ता ( सकाळी 11 वाजताच्या दरम्यान)
– मुंबईचा प्रवास (दुपारी)
– नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खुल्या बसने विजय परेड ( 4-6 वाजताच्या दरम्यान)
– 125 कोटींची बक्षीस रक्कम जय शाह संघाला वितरित करतील (संध्याकाळी वानखेडे स्टेडियम येथे)

महत्तवाच्या बातम्या-

हॉकी पुणे लीग : पीसीएमसी अकॅडमीने इन्कम टॅक्सला 3-3 असे बरोबरीत रोखले, जय काळेची गोल हॅट्ट्रिक
मुंबईतील टीम इंडियाची विजयी परेड घरबसल्या लाईव्ह कशी पाहता येणार? जाणून घ्या
धोनीच्या वाढदिवसाची ठिकठिकाणी जोरदार तयारी! या शहरांमध्ये होणार बायोपिकचं स्पेशल स्क्रिनिंग

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---