बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा शेवट टीम इंडियासाठी निराशाजनक झाला. सिडनी कसोटी 6 विकेट्सनी गमावल्यानंतर भारताने केवळ 1-3 अशी मालिका गमावलीच नाही, तर सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्याचे टीमचे स्वप्न भंगले. 5 जानेवारी रोजी संपलेल्या सिडनी कसोटीनंतर भारतीय संघाला आता विश्रांतीसाठी 16 दिवसांचा अवकाश आहे. टीम इंडियाला आता जानेवारीच्या अखेरीस इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे. इंग्लंडचा भारत दौरा 22 जानेवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडियाच्या पुढील वेळापत्रकावर एक नजर टाकूया-
इंग्लंडचा संघ जानेवारीच्या अखेरीस भारताच्या दौऱ्यावर येणार आहे, या दौऱ्यात इंग्लिश संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा भारत दौरा २२ जानेवारीपासून सुरू होत आहे, तर या दौऱ्यातील शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला होणार आहे.
प्रथम, भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल आणि मालिकेचा शेवट तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होईल.
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी20 सामना: 22 जानेवारी 2025, कोलकाता
दुसरा टी20 सामना: 25 जानेवारी 2025, चेन्नई
तिसरा टी20 सामना: 28 जानेवारी 2025, राजकोट
चौथा टी20 सामना: 31 जानेवारी 2025, पुणे
पाचवा टी20 सामना: 2 फेब्रुवारी 2025, मुंबई
(सर्व टी20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील)
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे वेळापत्रक-
पहिली वनडे: 6 फेब्रुवारी 2025, नागपूर
दुसरी वनडे: 9 फेब्रुवारी 2025, कटक
तिसरी वनडे: 12 फेब्रुवारी 2025, अहमदाबाद
(सर्व वनडे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होतील)
इंग्लंडने भारत दौऱ्यासाठी टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. जोस बटलर त्यांच्या दोन्ही पांढऱ्या चेंडू संघांचा कर्णधार असेल. तर बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाचा संघ निवडलेला नाही.
इंग्लंडचा टी-20 संघ: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्सी, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वूड
इंग्लंडचा वनडे संघ: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वूड
हेही वाचा-
विराट कोहली 2019 पर्यंत ‘हिरो’, मात्र 2020 पासून ‘झिरो’? पाहा धक्कादायक आकडेवारी
विराट कोहलीला सहकारी खेळाडूने दिला मोठा सल्ला, म्हणाला मैदानावरील वाद….
टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर, या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा