टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी संघाचीही घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवला टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तर भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. धोनीच्या जिवलग मित्राला वनडे संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा धोनीचा विश्वासू स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला वनडे संघात स्थान मिळालेले नाही.
जडेजा नुकताच टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा भाग होता. मात्र, त्याची कामगिरी काही विशेष नव्हती. या स्पर्धेनंतर जडेजाने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी वनडेमध्ये स्थान मिळालेले नाही. जडेजा टीम इंडियासाठी मोठा मॅचविनर ठरला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने शानदार गोलंदाजी केली आणि 11 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या. जर आपण वनडे फॉरमॅटमध्ये जडेजाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 2756 धावा केल्या आहेत आणि 220 विकेट्स घेतल्या आहेत.
आश्या परिस्थितीत श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय मालिकेत बीसीसीआयने रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान दिले आहे. दरम्यान सोशल मीडियावर रवींद्र जडेजाच्या संघामध्ये निवड न झाल्यामुळे चाहत्यांची प्रतिक्रिया समेर येत आहे.
Ravindra Jadeja dropped from the ODI team despite of taking 16 wickets and scoring with an average of 40 in the ODI World Cup 2023
Something is fishy for sure. pic.twitter.com/Glu1CSfGtM
— Aditi 🌷 (@ewww_aditii) July 18, 2024
अक्षर पटेल आणि युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यांना श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात स्थान मिळाले आहे. अक्षर पटेलही टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. त्याच वेळी, वॉशिंग्टन सुंदरला नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले, जिथे त्याने टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली आणि मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियात 5 दिग्गज खेळाडू, तरीही ज्युनीयर क्रिकेटरला केले वनडे-टी20 उपकर्णधार
हार्दिक-नताशाच्या मुलाची कस्टडी कुणाकडे रहणार? पहा काय सांगतेय हार्दिकची पोस्ट
बिग ब्रेकिंग ! अखेर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट, हार्दिकने स्वतः दिली माहिती