---Advertisement---

सुपर-8 फेरीसाठी टीम इंडियात धक्कादायक बदल; अभिषेक शर्मासह 3 खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट!

On: शुक्रवार, फेब्रुवारी 20, 2026 6:01 PM
---Advertisement---

टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ फेरीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुपर-८ फेरीसाठी ८ संघांना चार-चार संघांच्या दोन गटात विभागण्यात आले आहे. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने चारही सामने जिंकून गटात आघाडी मिळवली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली आहे, मात्र यूएसए आणि नेदरलंड्ससारख्या संघांनी भारतीय संघाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ग्रुप स्टेजचा आढावा घेतल्यास ईशान किशन, वरुण चक्रवर्ती आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र काही खेळाडू अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेले नाहीत. यामुळे सुपर-८ फेरीत काही खेळाडूंच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वाधिक चर्चेत राहिलेला नाव म्हणजे अभिषेक शर्मा. २०२५ मध्ये त्याने ८५९ धावा केल्या होत्या, मात्र २०२६ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये पहिल्या तीन सामन्यांत त्याला एकही धाव करता आली नाही. ग्रुप स्टेजच्या तुलनेत सुपर-८ फेरीतील सामने अधिक कठीण असल्याने अभिषेकला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची शक्यता आहे.

दुसरा खेळाडू रिंकू सिंग त्याने ग्रुप स्टेजमध्ये चार सामने खेळले, मात्र यूएसएविरुद्ध १४ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या. पुढील तीन सामन्यांत त्याने ६, ४ आणि ४ चेंडूंचा सामना केला. सहा-सात नंबरवर त्याला संधी मिळाली, पण आता वाशिंगटन सुंदरच्या आगमनामुळे रिंकूचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सुंदरचा समावेश झाल्यास टीमला फलंदाजीसोबत गोलंदाजीचा पर्यायही मिळतो.

तिसरा खेळाडू म्हणजे अर्शदीप सिंग. तो संघात सामील होणे पिचच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. श्रीलंकेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळताना अर्शदीपच्या जागी अतिरिक्त स्पिनर कुलदीप यादव खेळवण्यात आला होता. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या दोन मुख्य पेसर आहेत, त्यामुळे सुपर-८ फेरीत चेन्नईमध्ये स्पिनरला संधी देण्यासाठी अर्शदीप प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---