भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू टीम इंडियामधून बऱ्याच काळापासून बाहेर आहे. एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा कायमस्वारुपीचा फलंदाज म्हणून गणना केली जात होती. पण काळाच्या ओघात त्याचे नावे कोठे हरपले हे कळलेच नाही. हा दुसरा कोणता फलंदाज नसून करुण नायर आहे. भारतासाठी त्याने मार्च 2017 मध्ये शेवटचा सामना खेळला होता.
दरम्यान आता भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी करुण नायरने मोठे वक्तव्य केला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड देणारा भारतीय फलंदाज करुण नायरला आपल्या कारकिर्दीला नवी दिशा द्यायची आहे. करुण नायरने भारतासाठी शेवटचा सामना खेळून सात वर्षे झाली आहेत. पण गेल्या वर्षभरात त्याने आपली जुनी जादू दाखवली आहे. या काळात या फलंदाजाने विदर्भ आणि इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरसाठी काही उपयुक्त खेळी खेळल्या आहेत.
आपली भावना व्यक्त करताना तो म्हणाला, “आपण नेहमी मेहनत करण्याची तयारी ठेवावी. प्रत्येक गोष्ट पुढच्या सामन्याशी निगडीत आहे. मी फार पुढचा विचार करत नाही कारण काहीवेळा तुम्ही पुढे काय होणार आहे या विचारात अडकून पडता. गेल्या एका वर्षात मी सर्व फॉरमॅटमध्ये खूप धावा केल्या आहेत. गेल्या एक वर्षापासून मी जे करत आहे ते करण्याचा मी प्रत्येक संधीवर प्रयत्न करत आहे. मी प्रत्येक संधीकडे नवीन संधी म्हणून पाहत आहे”.
करुणच्या कारकिर्दीत सकारात्मक बदलाची पहिली चिन्हे दिसली. जेव्हा त्याला 2023 च्या सुरुवातीला नॉर्थम्प्टनशायरकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने तीन सामन्यांमध्ये 83 च्या सरासरीने 249 धावा केल्या. ज्यात चॅम्पियन सरेविरुद्ध शतकाचा समावेश होता. या वर्षी त्याने काउंटी क्रिकेटमध्ये सात सामन्यांमध्ये 49 च्या सरासरीने 487 धावा केल्या. ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.
पुढे बोलताना तो म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांसाठी इंग्लंडमध्ये धावा करणे सोपे नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे मी स्वत:ला एक फलंदाज म्हणून समजून घेणे. धावा काढण्याचे मार्ग शोधणे आणि स्वत:वर विश्वास ठेवण्याबद्दल बरेच काही शिकलो आहे. मी इंग्लंडमध्ये शिकलेल्या अनेक गोष्टी आहेत.
हेही वाचा-
रवी अश्विनने निवडले ऑलटाईम आयपीएल प्लेइंग इलेव्हन, क्रिकेटमधील देवालाच बाहेर!
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला धक्का; धडाकेबाज क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा
राष्ट्रीय क्रीडा दिन: काय आहे इतिहास, का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या एका क्लिकवर