मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्रिकेटच्या नियमात काही बदल करण्यात येत आहे. स्टेडियममधील सामने आता प्रेक्षकांविना खेळवले जातील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयसीसीने गोलंदाजांना चेंडूवर लाळ लावण्यास निर्बंध घातले आहे. आयसीसीचा हा नवा नियम गोलंदाजांसाठी अवघड ठरणार आहे. याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक उपाय सुचवला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार ई-सलाम क्रिकेट 2020 या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर म्हणाला की, “पंचाकडे ‘वॅक्स’ दिला जाऊ शकतो. याचा वापर गोलंदाज करू शकतील. आयसीसीने याच्यावर विचार करावा.”
तो म्हणाला, कोरोना नंतर क्रिकेट सुरू होईल तेव्हा आयसीसीचे हे नवे नियम लागू होतील. नियमानुसार गोलंदाज चेंडूला लाळ लावू शकणार नाही. केवळ घामाचा वापर करू शकतात. पण असे काही देश आहेत जिथे घाम येत नाही, मग गोलंदाज घाम कुठून आणणार? असा प्रश्नही त्याने यावेळी उपस्थित केला.
जर रिव्हर्स स्विंग होत नसेल तर रिव्हर्स स्विंग होणारे चेंडू दिले जाऊ शकतात. चेंडूला लाळ लावू दिले नाही तर गोलंदाजांसाठी अवघड परिस्थिती होणार आहे.
प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येऊ न देता सामने खेळण्यावर सचिन म्हणाला की, “स्टेडियममध्ये जर प्रेक्षक आले तर खेळाडूंमध्ये ऊर्जा भरते. प्रेक्षक नेहमीच खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे काम करतात. सामना पाहण्यासाठी पंचवीस टक्के लोकांना उपस्थिती दिली तरीही चालू शकते.”
ट्रेंडिंग घडामोडी –
आफ्रिदीला कोरोनाची लागण होताच गौतम गंभीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
मूळचे राजस्थानचे असलेले सोलंकी ‘या’ संघाला देणार क्रिकेटचे धडे
रागाच्या भरात चाहत्याला मारण्यासाठी नेले ड्रेसिंग रुमपर्यंत ओढत, पहा त्या खेळाडूचा व्हिडिओ