येत्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. येत्या काही दिवसांमध्ये कसोटी क्रिकेटसामन्यासाठी लाल चेंडू ऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाऊ शकतो. सध्या फक्त डे नाईट कसोटी सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जात आहे. पण माध्यमांतील वृत्तांनुसार आता कसोटी क्रिकेटमधील प्रत्येक सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जाऊ शकतो.
असे अनेकदा पाहिले गेले आहे की, कमी सूर्यप्रकाशामुळे किंवा खराब वातावरणामुळे कसोटी सामना खेळाताना खेळाडूंना अडचणी येतात. खासकरून जेव्हा कसोटी सामना लाल चेंडूने खेळला जात असेल, तेव्हा अशा प्रकारच्या अडचणींचा सामना दोन्ही संघांना करावा लागतो. पण गुलाबी चेंडू (Pink ball) असल्यानंतर अशा अडचणी येणार नाहीत, असे सांगितले जात आहे. कसोटी क्रिरकेटची सुरुवात 1877 मध्ये झाली, तेव्हापासून आजपर्यंत या फॉरमॅटमध्ये लाल रंगाचा चेंडू वापरला जात आहे. 2015 मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये गुलाबी रंगाचा चेंडू वापरला गेला.
कसोटी क्रिकेटला अधिर रोमांचक बनवण्यासाठी डे नाईट कसोटी सामने खेळले जाऊ सकले आणि यामध्ये लाल ऐवजी गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाऊ लागला. डे नाईट कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी रंगाचा चेंडू जरी वापरला जात असला, तरी या सामन्यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. गुलाबी रंगाच्या चेंडूने म्हणजेच डे नाईट सामने 2015 पासून आतापर्यंत फक्त 21 खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ डे नाईट कसोटी सामने खेळण्याच्या बबातीत सर्वात पुढे आहे. द टेलिग्राफच्या माहितीनुसार गुलाबी चेंडू वापरल्यामुळे कसोटी क्रिकेट अधिक सुलभ होईल आणि डे नाईट सामने जास्त प्रमाणात खेळले जातील. सध्या जे सामने कमी सूर्यप्रकाशामुळे प्रभावित होतात, तसे प्रकार देखील यामुळे बंद होतील.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी खेळला गेलेला सामना ड्रॉ केला गेला. कमी सूर्यप्रकाशामुळे हा सामना ड्रॉ झाला असून आयोजकांवर चांगलीच टीका देकील केली गेली. (Test cricket may use pink ball instead of red ball in coming days)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराज आणि उमरानकडून मोठी चूक! नेटकऱ्यांकडून हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप
दादा धोनीवर सोपवणार मोठी जबाबदारी! सुपर किंग आणि प्रिंस ऑफ कोलकाताच्या भेटीचा फोटो व्हायरल