---Advertisement---

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ५: लक्ष्मणची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळी

---Advertisement---

-महेश वाघमारे

भारतीय क्रिकेट पहिल्यापासून कसोटी फलंदाजीसाठी समृद्ध आहे. महाराजा रणजीत सिंग, सीके नायडू, लाला अमरनाथ यांच्यापासून सुरू झालेली परंपरा पॉली उम्रीगर, सुनील गावस्कर ,सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड ते आत्ता विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांच्यापर्यंत अव्याहतपणे सुरू आहे.

२००० नंतर तर, सचिन, द्रविड,गांगुली, सेहवाग व लक्ष्मण यांच्या इतकी धोकादायक फलंदाजांची फळी कोठेच नव्हती. या सर्वांनी त्या दशकात अनेक अविस्मरणीय खेळ्या केल्या. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मणची कोलकाता येथे खेळली गेलेली २८१ धावांची खेळी.

मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर सौरव गांगुलीच्या हाती भारतीय संघाची धुरा सोपवली गेली होती. या नवीन संघासाठी पहिलीची परीक्षा अवघड होती. सलग १५ कसोटी जिंकलेला स्टीव वॉचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. काही दिवसांपूर्वीच क्रिकेटचे सम्राट डॉन ब्रॅडमन यांचे निधन झाल्याने या मालिकेला दुःखाची किनार लागली.

मुंबईमधील मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारत आपला विक्रमी सोळावा कसोटी विजय साजरा केला. या सामन्यात जवागल श्रीनाथ दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर गेला. भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी भारतीय क्रिकेट संपले असे जाहीरच करून टाकले. एकंदरीत दुसऱ्या कसोटीपूर्वी वातावरण तणावाचे झाले होते.

दुसरी कसोटी कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार होती. ऑस्ट्रेलियाने ‌ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर नियंत्रण मिळवून १९३-१ अशी धावसंख्या उभारली होती. अंतिम सत्रात रिकी पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांच्यासह पाच बळी घेत हरभजनने, ऑस्ट्रेलियाला दिवसाअखेर २५२-७ वर रोखले. कसोटीत हॅटट्रिक घेणारा हरभजन पहिला भारतीय खेळाडू ठरला. अखेर दुसऱ्या दिवशी, ऑस्ट्रेलियाचा डाव ४४५ धावांवर संपुष्टात आला. हरभजनने १२३ धावांत ७ बळी घेतले.

पहिल्या डावात भारताची अवस्था पहिल्या कसोटीहून खराब झाली. ग्लेन मॅकग्राच्या चार व गिलेस्पी, कॅस्प्रोविच व वॉर्नच्या प्रत्येकी दोन बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला १७१ धावांवर बाद केले. भारताकडून लक्ष्मणने सर्वाधिक ५९ धावा केल्या.

पहिल्या कसोटीप्रमाणे, यावेळीही भारताला पराभव पत्करावा लागणार अशी खात्रीच दर्शकांना झाली होते. कारण जवळपास तीन दिवस भारताला खेळून काढावे लागणार होते. २७५ धावांची पिछाडी भरून काढून ऑस्ट्रेलियाला एक आव्हानात्मक लक्ष देणे गरजेचे होते.

तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात, फॉलोऑन मिळाल्याने, भारत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी उतरला. सलामीवीर शिव सुंदर दास व सदगोपण रमेश यांनी ते सत्र खेळून काढले. पुढच्या सत्रात मात्र, भारताने दोन्ही सलामीवीरांसोबत हुकमी सचिन तेंडुलकरलादेखील गमावले. तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात लक्ष्मण व कर्णधार गांगुली ही जोडी चांगली जमली. लक्ष्मणने कोणतेही दडपण न घेता आपल्या शैलीत शतक साजरे केले तर गांगुलीने त्याला साथ दिली. दोन्ही खेळाडू तिस-या दिवशी नाबाद राहणार असे वाटत असताना गांगुली वैयक्तिक ४८ धावांवर मॅकग्राची शिकार झाला. भारतीय व्यवस्थापनाने नाईट वॉचमन पाठवण्यापेक्षा प्रमुख फलंदाज राहुल द्रविडला मैदानात पाठवले. दोघांनीही राहिलेली षटके खेळून काढली.

मैदान सोडताना सर्वांना वाटत होते, ऑस्ट्रेलिया आपला सतरावा कसोटी विजय चौथ्या दिवशीच मिळवणार. ऑस्ट्रेलियन खेळाडू तर पूर्णपणे या गोष्टीशी सहमत होते. पण, त्यांना माहीत नव्हते चौथ्या दिवशी काय होणार आहे.

दिवसाचा खेळ सुरू झाला आणि लक्ष्मण व द्रविड खेळत राहिले, खेळत राहिले आणि खेळतच राहिले..‌ पहिल्या सत्रात भारत ३७६ धावांपर्यंत पोहोचला होता. लक्ष्मण १७१ तर द्रविड ५० धावा काढून नाबाद होते. दुसऱ्या सत्रातही तीच कहाणी.. एक संधीही ही न देता दोघे आपली व संघाची धावसंख्या वाढवत राहिले. लक्ष्मण द्विशतकाची तर द्रविड शतकाची वेस ओलांडून पुढे गेला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाज वैतागले होते पण या दोघांमध्ये काहीही फरक पडला नाही. पहिल्या दोन सत्रांप्रमाणेच तिसऱ्या सत्रात देखील ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना संधी न देता पूर्ण दिवस दोघांनी फलंदाजी केली. यादरम्यान, लक्ष्मणने सुनील गावसकर यांचा २३६ धावांचा विक्रम मागे सोडला.

त्यादिवशी, जसजसा दिवस पुढे सरकत होता तसतसे, खऱ्या क्रिकेटच्या वातावरणात ईडन गार्डन्स रंगून चालले होते. देशातील टीव्ही चालू होते, सचिनची फलंदाजी नसतानाही सकाळपासून टीव्ही पाहण्याचे एकच कारण होते की, आपण जिंकू असा विश्वास सर्व भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना वाटू लागला होता.

चौथा दिवस संपला तेव्हा भारताची धावसंख्या ५८९-४ होती. भारताला ३१५ धावांची आघाडी मिळाली होती. लक्ष्मण व द्रविड हे दोघे एका ऐतिहासिक खेळीदरम्यान पूर्ण दिवस नाबाद राहत पव्हेलियनकडे परतत असताना, संपूर्ण स्टेडियम व विरोधी खेळाडू देखील मनापासून टाळ्या वाजवत होते.

अखेरच्या दिवशी, लक्ष्मण त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय बनेल, या आशेने इडन गार्डन्स खचाखच भरले. दुर्देवाने, चौथ्या दिवशीच्या २७५ धावसंख्येत अवघ्या ६ धावांची भर घालत लक्ष्मण तंबूत परतला.‌ लक्ष्मण बाद होताच द्रविडने धावांचा वेग वाढवला. द्रविड द्विशतकाकडे मार्गक्रमण करत असताना दुर्दैवीरित्या १८० धावांवर धावबाद झाला. द्रविड बाद होताच भारताने आपला डाव ६५७ धावसंख्येवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८४ धावांचे लक्ष दिले गेले.

युवा हरभजन सिंगने गोलंदाजीत पुन्हा एकदा कमाल करत ६ बळी मिळवले. भारताने अवघ्या दोन सत्रांत ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करत १७१ धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाची सलग १६ कसोटी विजयाची साखळी तुटली होती. भारताने एक ऐतिहासिक विजय मिळवला होता. एक असा विजय जो, येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार होता. संघर्ष करायला शिकवणार होता.

टेस्ट इनिंग्स स्पेशल लेखमालिकेतील वाचनीय लेख

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ४- शैलीच्या विपरीत खेळत डिविलीयर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या, परंतू क्रिकेटरसिकांच्या हृदयात...

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग २- असामान्य खेळाडूकडून झालेली असामान्य खेळी

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग १- दिग्गजांच्या मांदियाळीत गंभीरची ती अजरामर मॅरेथॉन खेळी

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!

आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल फ्रंचायझी आहेत स्पॉन्सर्सच्या शोधात, तब्बल ९५% इन्वेंट्रीची केलीय विक्री

मार्चनंतर पहिल्यांदाच चाहत्यांना मिळाली स्टेडिअममध्ये एंट्री; तब्बल १००० चाहत्यांच्या उपस्थिती पार पडला सामना

बांगलादेशच्या या युवा गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---