---Advertisement---

३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका

On: गुरूवार, ऑगस्ट 27, 2020 10:08 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू  कमाल करतात, पण त्याचबरोबर अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूही अनेकदा अफलातून कामगिरी करताना दिसतात. आयपीएल हा जरी युवा खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफाॅर्म असला तरीही वरिष्ठ खेळाडूंसाठीही एक हक्काचे व्यासपीठ आहे.

यावेळीही 38 पेक्षा अधिक वय असणारे खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंबरोबरच या वरिष्ठ खेळाडूंकडेही सर्वांचे लक्ष असणार आहेत.

3८ पेक्षा अधिक वय असणारे हे खेळाडू आयपीएलमध्ये करु शकतात धमाका-

3. हरभजन सिंग – 

मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीही हरभजन सिंग आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. हरभजन 39 वर्षांचा असून त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 160 सामने खेळले आहेत. यात त्याने 150 विकेट्स घेतले आहेत आणि 829 धावाही केल्या आहेत. त्यामुळे तो चेन्नईसाठी फक्त अनुभवी गोलंदाज म्हणूनच नाही तर तळातला फलंदाज म्हणूनही फायदेशीर ठरु शकतो.

2. एमएस धोनी –

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असणारा धोनी यावर्षी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. 38 वर्षीय धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 23 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. तसेच त्याने मागीलवर्षीही आयपीएलमध्ये चांगला खेळ केला होता. त्याने मागीलवर्षी 15 सामन्यात खेळताना 3 अर्धशतकांसह 83.20 च्या सरासरीने 416 धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर त्याचे यष्टीरक्षण हे देखील चेन्नईसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 190 सामने खेळलेल्या धोनीकडून चेन्नईला यावर्षीही दमदार खेळाची अपेक्षा असेल.

1. ख्रिस गेल – 

40 वर्षीय ख्रिस गेल हा तर त्याच्या आक्रमक खेळीसाठीच ओळखला जातो. त्याने यापुर्वी विंडिज संघाकडून दमदार खेळ केला आहे. तसेच त्याने आयपीएलमध्येही अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत.

ख्रिस गेलने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये तुफानी खेळ करताना 125 सामन्यात 41.13 च्या सरासरीने 4484 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 6 शतकांचा आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.

क्रिकेटवरील ‘गोष्ट एका क्रिकेटरची’ लेखमालेतील अन्य लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालेतील काही खास लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---