भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. पाकिस्तानचा घरात घुसून पराभव केलेल्या बांगलादेशचा भारताने धुव्वा उडवला. भारतीय संघाने 2-0 ने मालिका जिंकली. पण बांगलादेशला हा पराभव चांगलाच झोंबला. पराभवानंतर बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हातुरूसिंघा (Chandika Hathursingha) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या तीन दिवशी पावसानेच फलंदाजी केली, पावसामुळे आठ सत्रे खेळता आली नाहीत आणि सामना अनिर्णित बरोबरीत निघाल्याचे दिसत होते. मात्र, भारताने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावात गुंडाळल्यानंतर भारताने अवघ्या 34.4 षटकांत 9 विकेट्सवर 285 धावांसह डाव घोषित केला आणि 52 धावांची आघाडी घेतली. भारताच्या या वृत्तीने निकालाच्या आशा उंचावल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशला 146 धावात गुंडाळल्यानंतर भारताने 17.2 षटकांत 95 धावांचे लक्ष्य आरामात गाठले.
सामन्यानंतर हातुरूसिंघा म्हणाले, “अशी आक्रमक वृत्ती यापूर्वी पाहिली नव्हती. आम्ही पटकन प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. अशा वृत्तीचे आणि सामन्यातील निकालाचे श्रेय रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याच्या संघाला जाते. पाकिस्तानविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर येथे आलेला हा पराभव वेदनादायी आहे. हा पराभव आमच्यासाठी खूप वेदनादायी आहे. फलंदाजी निराशाजनक होती, गेल्या काही मालिकांमध्ये आम्ही आमच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकलो नाही.”
गोलंदाजांनी फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली का? असे विचारले असता हातुरूसिंघा म्हणाले की, “मी आपल्या खेळाडूंची तुलना करत नाही. दोन्ही माझे खेळाडू आहेत, दुसरे कारण म्हणजे विरोधी संघाची पातळी आणि अव्वल दर्जाचे कौशल्य या मालिकेत पाहायला मिळाले, आम्ही येथून शिकत आहोत. या मालिकेने त्यांना काय सुधारणा करणे आवश्यक आहे हे शिकवले.”
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO; वर्षांनंतर बाप-लेकीची भेट! क्षणीच भावूक झाला ‘हा’ स्टार क्रिकेटपटू
IND vs BAN; विजयानंतर गंभीरने कोहलीला मारली मिठी! VIDEO व्हायरल
IND vs BAN; ‘या’ 3 स्टार खेळाडूंचे भारताच्या टी20 संघात होणार पदार्पण?